अत्यंत विश्वासू कार्यकर्त्याचा मानाचा वाढदिवस — राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते माजी नगरसेवक अकील काझी यांच्या वाढदिवसाचा विशेष सोहळा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी)
म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते अकील काझी यांच्या वाढदिवसाचा सोहळा यंदा विशेष ठरला. राज्याचे ग्रामविकासमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला. मंत्री गोरे यांनी स्वतःच्या हातावर केक धरून कार्यकर्त्याला तो कापायला लावला, हा क्षण म्हसवडकरांसाठी भावनिक ठरला.

अकील काझी हे मंत्री जयकुमार गोरे यांचे अत्यंत निष्ठावंत, प्रामाणिक व विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. म्हसवड नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवला असून, जनतेत आणि कार्यकर्त्यांत त्यांचा चांगला दबदबा आहे. ग्रामविकासमंत्री गोरे यांच्याशी असलेली त्यांची निष्ठा आणि सातत्यपूर्ण साथ यामुळे ते स्थानिक राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनले आहेत.
वाढदिवसाच्या या सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी “अकीलसारखा सच्चा कार्यकर्ता प्रत्येक नेत्याच्या पाठीशी असावा” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. कार्यकर्त्यांप्रती असलेले मंत्री गोरे यांचे आत्मीय प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या मनातील आदर याचे प्रतिक या प्रसंगी स्पष्टपणे दिसून आले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विजय धट, संजय सोनवणे, अक्षय पिसे, विजय बनगर, लांब, दत्ता डावकरे, आप्पा पुकळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे वातावरण उत्साही, प्रेमळ आणि ऐक्यदर्शक बनले होते.
अकील काझी यांना वाढदिवसानिमित्त राजकारण, सामाजिक कार्य आणि सेवाभावाचा आदर्श जपणाऱ्या कार्यकर्त्याचा नमुना म्हणून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

