म्हसवड नगरीचे सर्वांचे लाडके नेतृत्व इंजि.सुनील पोरे यांच्या वाढदिवसानिमित्  शुभेच्छा 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
आज म्हसवड नगरीचे सर्वांचे लाडके नेतृत्व इंजि.सुनील पोरे यांच्या वाढदिवस त्या निमित्त    
                             इंजि. सुनील पोरे एक व्यक्ती नसून विचार बाटतात त्यांचे जीवन म्हणजे धगधगती मशाल असल्याचे जानवते  दुष्काळी माण तालुक्यात अनेक हिरे रत्ने मोती जन्माला आलेत. त्या रत्नांपैकीच एक म्हणजे सुनील पोरे, यांचा जन्म सातारा जिल्हयातील म्हसवड नगरीत ११ डिसेंबर १९६१ रोजी झाला. घरंदाज शिंपी घराण्यातून सुरू झालेली त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे. प्राथमिक शिक्षण म्हसवड मध्ये घेऊन त्यांनी विद्येचे माहेरघर असलेले पुणे येथे १२ वी पर्यंत शिक्षण घेतले व पुढील शिक्षणासाठी कर्नाटक येथील हुबळी येथे आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर जुलै १९८३ मध्ये प्रथम श्रेणीत अभियंता पदाची पदवी मिळविली.
           मोठ्या शहरांमध्ये अभियंता म्हणून अनेक संधी चालून आल्या. जानेवारी १९८४ साली सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये खटाव तालुक्यातून आपल्या सेवेला प्रारंभ केला. यामागे आपल्या मायभूमीची सेवा घडावी, हाच त्यामागील हेतू होता. ते बांधकाम विभागात कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेची स्थापना करून या संघटनेचे जाळे संपूर्ण राज्यभर तयार केले. सहकाऱ्यांच्या मदतीला धाऊन जाणे हा सुनील पोरे साहेब यांचा स्थायी स्वभावच, जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्यातील नेतृत्व गुण दाखवून सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेत अनेक लोकोपयोगी कामेही मार्गी लावली. ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
सामाजिक कार्य:
         या सेवेच्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्तीनंतर त्यांनी म्हसवड मध्ये शुभम ग्रुप ऑफ बिझनेस व जनश्री फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळी माणदेशात समाजकार्य केले. काही माणसे फक्त स्वतःसाठी जगतात; परंतु पोरे साहेब हे अपवाद आहेत. पोरे कुटुंबीय हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत म्हसवड शहरवासीयांसह सातारा जिल्हयात अडीअडचणीच्या काळात त्यांचा नेहमीच मदतीचा हात पुढे असतो. प्रतिवर्षी रक्तदान शिबिरे, पाणपोई, वारकऱ्यांना वारीमध्ये फळांचे वाटप, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप, सार्वजनिक मंडळना मदत आदी समाज उपयोगी उपक्रम राबवतात, कोरोना महामारीच्या काळामध्ये पोरे कुटुंबियांनी ज्यांची चूल पेटणं अवघड झालेलं आहे, अशा अनेक गरजू कुटुंबांना कोणताही गाजावाजा न करता संपूर्ण रेशन देऊन मानवतावादी काम केले, तसेच हॉस्पिटलमधील रुग्णांना नाश्ता, फळे, अंडी देऊन रुग्णांचे आशीर्वाद घेण्याचेही कार्य केले आहे. कोरोना साथीच्या काळात त्यांनी गरजूंना मोफत औषधे व्हिटॅमिन गोळ्या देण्याचे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवतेने सेवाकार्य सुरू ठेवले. कोरोनात अत्यवस्थ रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येताच सुसज्ज रुग्णवाहिका स्वखर्चाने खरेदी करून गरजू रुग्णास उपलब्ध करून दिली. या सेवेमुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांना जीवदान मिळाले. अनेक गरजू वृद्धांची डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करून अनेक वृद्धांना दिलासा दिला. इंजिनीयर सुनील पोरे साहेब यांनी आत्तापर्यंत ४२ देशांचा दौरा केला असून, संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. ते म्हसवड ते पंढरपूर, म्हसवड ते शिंगणापूर, म्हसवड ते गोंदवले असा सायकल प्रवासही नियमित करत असतात. म्हसवड शहराला निजंतुक व स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी पायाभूत विकास देण्यासाठी वेळ प्रसंगी उपोषण, संघर्ष केला आहे. याचबरोबर गेली पाच वर्षे सातारा सोलापूर या महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्यामुळे वारंवार झालेल्या अपघातामुळे अनेकजण जखमी झाले, तर काहींना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात म्हणून नुकताच त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेतली. म्हसवड पालिका हद्दीतील महामार्गावरील रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यासाठी त्यांनी माण खटावचे पाणीदार आमदार मा. जयकुमार गोरे साहेब यांचे माध्यमातून   पाठपुरावा केला. तसेच शेतीला पाणी मिळावे म्हणून मागील काळात माणगंगा नदीला उरमोर्डचे पाणी सोडण्यासाठी आमरण उपोषण करून हा प्रश्न मार्गी लावला होता.
समाज कार्य :
       प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेल्या इंजिनियर सुनिल पोरे या म्हसवडनगरीच्या सुपुत्रास त्यांचे कार्याची दखल घेऊन नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष कै.संजीवजी तुपसाखरे व सर्व राज्य कार्यकारिणीने एकमताने सातारा जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली त्यांनी देखील केलेली जिल्हाध्यक्ष पदाची निवड सार्थ करत त्या कार्याची सुरुवात रक्तदान सारखे राष्ट्रीय कार्याने प्रारंभ करून रेकॉर्ड ब्रेक तब्बल १६१ रक्तदान करवून घेऊन केले संपुर्ण सातारा जिल्ह्यातील गांवागावात शिंपी समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी धडाकाच उडवून दिला आहे व श्री पोरे यांचे समाज जागृतीचे कामास संपूर्ण सातारा जिल्ह्यातूनसकारात्मक प्रतिसाद मिळत आहे  या त्यांच्या जीवन प्रवासात त्याची सौभाग्यवती सुवर्णा पोरे, संचालिका शुभम भारत गॅस एजन्सी, मुलगी डॉ स्वप्ना राजेश्वर सुपेकर, जावई डॉ राजेश्वर सुपेकर (एम. डी. मेडीसिन) पुणे, मुलगा करण ऑटोमोबाईल इंजिनिअर, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय व भाजपा ओबीसी युवक प्रदेशाध्यक्ष, व सुनबाई सौ. राजलक्ष्मी गृहीणी. छोटा मुलगा अॅड. शुभम व सुनबाई अॅड. प्राजक्ता उर्फ गौरी व नातवंडे यांचे मोलाचे सहकार्यमिळत असते.  अशा थोर समाजसेवकास वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा
          शुभेच्छुक  पत्रकार अहमद मुल्ला ,पत्रकार सचिन मंगरुळे म्हसवड

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!