सौ हाफिजा फिरोज तांबोळी व सामाजिक कार्यकर्त्या सुमन धनाजी वसव यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
गोंदवले बुद्रुक :
गोंदवले बुद्रुक येथील तनिष्का व्यासपीठ गटाच्या सदस्या सौ हाफिजा फिरोज तांबोळी व सामाजिक कार्यकर्त्या सुमन धनाजी वसव यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कारामुळे सामाजिक कामासाठी हत्तीचे बळ मिळाल्याची भावना पुरस्कर्त्यांनी केली आहे.
गोंदवले बुद्रुक येथे तनिष्का व्यासपीठ गट अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.या गटाच्या माध्यमातून गोंदवल्यात जलसंधारण,पाणी व्यवस्थापन, दुष्काळमुक्ती,आरोग्य,शैक्षणिक गुणवत्ता,अंगणवाडी बालकांचे आरोग्य,वृक्षारोपण,सिडबॉल रोपण,पक्षी संवर्धन,महिला सबलीकरण, शालेय मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे,ग्रामस्वच्छता,पोलिसांना प्रोत्साहन असे अनेक उपक्रम गेल्या दहा वर्षापासून राबविण्यात आले आहेत.या कामांची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या निवड समितीने यंदाचा पहिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्कार तनिष्का व्यासपीठ गटाच्या सदस्या सौ हाफिजा तांबोळी यांना देण्यात आला.तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ एन रामस्वामी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण,जलतज्ज्ञ डॉ राजेंद्रसिंह राणा यांच्यामार्फत पाठपुरावा करून नदीवरील बंधारा दुरुस्ती व गाळ काढण्यात पुढाकार,लोहार समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम,तसेचकोरोना काळात लोकप्रबोधन व लोकसेवेसाठी पुढाकार,आरोग्याबाबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या गटाच्या माजी गटप्रमुख सौ सुमन वसव यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना सरपंच जयप्रकाश कट्टे म्हणाले,महिलांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.हा पुरस्कार मिळविण्यासाठी महिलांमध्ये सामाजिक कामांची चढाओढ लागून गावाच्या विकासाला मोठी मदत होईल.
उपसरपंच संजय माने म्हणाले,गोंदवले बुद्रुक गावाची शान उंचविण्याचे काम गावातील तनिष्का व्यासपीठ गटाच्या महिलांकडून होत आहे.सामाजिक कामांसाठी महिलांना ग्रामपंचायतीने नेहमीच पाठबळ दिले आहे.जेणेकरुन महिला सक्षम होण्यास मोठी चालना मिळेल.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील,सौ अश्विनी कट्टे,तानाजी शिंगाडे,गुरुदत्त कुलकर्णी,सोसायटीचे चेअरमन अभिजित कट्टे,पोलीस पाटील आशा भोसले, माजी सरपंच विष्णुपंत कट्टे,संदीप फडतरे,तनिष्का गटाच्या अध्यक्षा विद्या कट्टे व सर्व सदस्य,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी आर कट्टे सर यांनी केले.तर ग्रामविकास अधिकारी श्री अमोल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सौ हाफिजा तांबोळी.:
महिला सक्षमीकरणाबरोबरच गावाचा सर्वांगीण विकास हा अजेंडा घेऊन तनिष्का व्यासपीठ गट गोंदवले बुद्रुकमध्ये कार्यरत आहे.आमच्या कार्याची दखल घेऊन निवड समितीने पारदर्शीपणे शासनाचा पुरस्कार दिला याचा मनस्वी आनंद होत आहे.—-

