दि. १ ऑगस्ट ते दि. ७ ऑगस्ट जागतिक स्तन पान सप्ताह निमित्त स्तनदा माता मध्ये स्तनपान विषयी जनजागृती वाढावी यामधील आईला व बाळाला होणारे फायदे तसेच निव्वळ स्तनपान, पुरक आहार, स्तनपानाची योग्य पध्दत, आणि सध्याच्या काळात बदलेली जीवन शैली व चुकीच्या पध्दतीने मातेच्या दुधाऐवजी इतर पदार्थांचा वापर व त्यामुळे बालकांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम या विषयी डॉ. संजय कुंभार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगड यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
बाळाच्या जन्मानंतर लगेच स्तनपान सुरु व्हायला पाहिजे. विशेषतः चिकदुध बाळाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. बाळाची प्रतिकारशक्ती वाढते . ॲटी बाॅडीज मुळे नवजात बाळाला इतर आजारापासून धोका होत नाही. सहा महिन्यांपर्यंत बालकाला निव्वळ स्तनपान द्यावे. त्यानंतर हळू हळू पुरक आहार देण्यास सुरुवात करावी. यामुळे बाळाचे कुपोषण होत नाही. सदृढ बाळ, गुटगुटीत बाळ होते. आई ला स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, या पासून कमी धोका होतो. व एक नैसर्गिक गर्भनिरोधक काम स्तनपानामुळे होत असते. अशाप्रकारचे बाळाला व आईला भरपूर फायदे आहेत. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे डेंग्यु, मलेरिया, अतिसार या सारख्या साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, हात साबण पाण्याने धुणे, पिण्यासाठी स्वच्छ निर्जंतुक पाणी पिणे, घराभोवतालचा परीसर स्वच्छ ठेवणे. पावसाचे पाणी साचून डासांची पैदास होणार नाही.यासाठी निकामी वस्तू फुटके डबे, टायर या मध्ये पाणी साचून न देणे. अशी खबरदारी घेतल्यास आजारापासून धोका निर्माण होत नाही. या वेळी सुनील सुर्यवंशी, शंकर वीर आ सहाय्यक, रोहीनी माने आरोग्य सहाय्यीका, बलवीर राजगडकर क सहाय्यक, आरोग्य सेवक, आशासेविका, स्तनदा माता, व नागरिक उपस्थित होते