पालकमंत्री शंभूराज देसाई यांची लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यांच्या पूर्वतयारीची पाहणी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

पाटण (प्रतिनिधी : श्रीकांत जाधव)

पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब यांनी उद्या होणाऱ्या विविध लोकार्पण सोहळे आणि भूमिपूजन कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

नाडे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असून, या ऐतिहासिक पुतळ्याच्या उभारणीचे काम पाहण्यासाठी देसाई यांनी स्वतः भेट दिली.

पाटण नगरपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचीही पाहणी केली. पाणीयोजनेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पाटण शहरासाठी आवश्यक असून, यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

काळोली येथे लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या उद्घाटन सोहळ्याची तयारीदेखील जोरात सुरू आहे. या बहुउद्देशीय कृषी संकुलामुळे शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

 

यावेळी शिवसेना पाटण शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. मंत्री शंभूराज देसाई यांनी चौधरी यांना शाल आणि श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या महत्त्वाच्या कार्यक्रमांदरम्यान, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा), जयराज देसाई (दादा) यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!