म्हसवड नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, १४ ऑक्टोबर २०२४:
म्हसवड नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा सोमवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४:०० वाजता संपन्न होणार आहे. हा विशेष सोहळा महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात माण-खटाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांची प्रमुख उपस्थिती असेल. या विकास कामांसाठी तब्बल १३६.०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या माध्यमातून म्हसवड नगरपरिषद हद्दीत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
विकासाच्या या कामांमुळे म्हसवड शहराच्या मूलभूत सोयीसुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
नागरिकांनी मोठ्या या कार्यक्रमासाठी संख्येने उपस्थित रहावे