म्हसवड येथे शिंपी समाजाचे वतीने जिल्हा अध्यक्ष इंजि सुनील पोरे यांचे नेतृत्वाखाली नामदेव महाराज व परिवार संजीवन समाधी सोहळ्या निमीत्त ज्ञानेश्वरी पारायणने सुरुवात करुन २ ऑगस्ट त्रयोदशी दिवशी अभिषेक काकड आरती पालखी गावांतून मिरवणुक आदी कार्यक्रमाने पार पडला
मिरवणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे सहभागी पुरुषांनी पांढरा पेहराव तर महिलांनी एक टाइपची लाल रंगाची साडी हे होते अतिशय शिस्थबध्द चालीत महिलांनी बसवलेले माऊली या चित्रपटतील गाणे टाळ मृदुंगाचे तालातील सादरीकरण दर्शकाचे लक्ष वेधून घेत होते हे गीत गायत्री फुटाणे हिने दिग्दर्शित केले होते यात सुवर्णा पोरे, रोहिणी चांडवले ,नामदास मॅडम आदी दहा महिलांनी सहभाग घेतला होता
मिरवणुक गाव फेरा मारुन मंदिरात आलेवर काल्याचे कीर्तन झालेवर फुले टाकण्यात आली यावेळी शिंपी समाजाचे वतीने प्रथमच आगळ्या वेगळ्या दुर्लक्षित वर्गाचे सत्कार ठेवणेत आले होते यात गो सेवक नागेश टेके, कचरा वेचक प्रतिनिधी धुळा मासाळ,बस स्थानक सेवक माणिक झगडे,व स्मशानात इमान इतबारे अंत्यविधी सेवा बजावणारे विलास येरेवाड यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून मान्यवराचे हस्ते करणेत आला या सत्काराणे ही मंडळी भारावून गेली व कोणी तरी आमच्या कामाची नोंद घेतली अशी प्रतिक्रिया दिली त्याच बरोबर समाजातील क्रिशव करण पोरे, देवराज सतीश चांडवले,नरेंद्र गिरीष पोरे,रमा प्रसाद चांडवले या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रावीण्य मिळवल्या बद्दल सत्कार केले तर नुकतेच केंद्र प्रमुखपदी निवड झाल्या बद्दल दिपक पतंगे गुरुजी यांचा देखील सत्कार करण्यात आला
किर्तनसेवा जगदीश महाराज पोरे यांनी केली त्याना साथ दिघची येथील वारकरी विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी केली सुत्रसंचलन राहुल फुटाणे यांनी केले कार्यक्रम यशस्वीते साठी संदीप नामदास ,गणेश नामदास, शार्दुल फुटाणे ,नंदु पोरे ,विजय चांदवले ,डॉ फुटाणे ,देविदास पोरे, करन पोरे,विजय जवंजाल,प्रकाश डोंगरे,रमेश पोरे आदीनी घेतले