व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर
मुंबई : नाट्यक्षेत्रासाठी अविरत झटणाऱ्या रंगमंच कामगारांसाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘अष्टविनायक’ नाट्यसंस्थेचे श्री. दिलीप जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित हे आरोग्य शिबीर यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात आयोजित करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली शिबिरामध्ये वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला १५०हून अधिक रंगमंच कामगारांनी मोफत आरोग्य तपासणी आणि सल्ला मसलतीचा लाभ घेऊन उत्तम प्रतिसाद दिला.
‘गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन’चे डॉ.गजानन रत्नपारखी, श्री. विशाल कडणे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या दोघांच्या विशेष सहकार्याने या शिबिराचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. यावेळी दिलीप जाधव यांनी ‘गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन’ चे डॉ.गजानन रत्नपारखी, श्री. विशाल कडणे यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.