९ अक्टोंबर ला कराड मध्ये सैनिक फेडरेशन आजी/माजी सैनिकाकडून भव्य “सैनिक सन्मान रॅली”

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीपमोहिते कराड

“सैनिक हो तुमच्यासाठी” अमृत वीर जवान अभियान अंतर्गत ले.कर्नल सतेश हंगे (नि.) उपसंचालक सैनिक कल्याण पुणे विभाग व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांचा आजी/ माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय व प्यारा मिलिटरी फोर्स माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय यांच्या महसूल , पोलीस विभाग व इतर विभागातील समस्या, अडचणीचा निपटारा करने कामी व सैनिक कल्याण विभागाच्या योजनांचे मार्गदर्शन करणे कामी शासन निर्णयानुसार कराड तालुका दौरा होत आहे

या पार्श्वभूमीवरआपल्या मातृभूमीसाठी स्वतंत्र मिळवून देण्यासाठी बलिदान देणारे स्वतंत्र सैनिक व भारत देशाच्या सीमेचे रक्षण करताना शहीद झालेले भारतीय सैन्य दलातील, प्यारा मिलिटरी फॉर्सेस मधील, महाराष्ट्र पोलीस दलातील या सर्व दलातील शहीद जवान यांच्या स्मृतीला त्यांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी सैनिक सन्मान रॅली बुधवार दि.०९/१०/२०२४ रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी पोलीस प्रशासनाला निवेदन* सैनिक फेडरेशन सातारा यांच्याकडून देण्यात आले आहे

सैनिक सलमान रॅलीचा मार्ग पुढील प्रमाणे असेल

सैनिक सन्मान रॅली प्रीती संगम कराड स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधी चे दर्शन घेऊन ते विजय दिवस चौक विजय स्तंबास पुष्प चक्र अर्पण करून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून ते तहसील कार्यालया पर्यंत काढण्यात येईल पुढे
कराड तहसील कार्यालय सभागृह येथे सैनिक मेळावा बैठकआयोजित करण्यात आली आहे या बैठकीला सर्व महसूल, पोलीस विभाग व इतर विभागातील अधिकारी उपस्थीत रहाणार आहेत.
तरी सर्व आजी/माजी सैनिक संघटना पदाधिकारी व सर्व दलातील आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांनी या सैनिक सन्मान रॅली* व सैनिक मेळाव्याच्या बैठकिस बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व विनंती . प्रशांत कदम (माजी सैनिक) महाराष्ट्र शासन जिल्हा संरक्षण समिती व अमृत वीर जवान अभियान समिती सदस्य व अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा यांनी केले आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!