म्हसळा शहरात भव्य मिरवणूक..शिवजयंती जल्लोषात साजरी.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
प्रतिनिधी म्हसळा (रायगड )

सालाबादप्रमाणे यंदाही फाल्गुन वद्य तृतीया शके १९४६ म्हणजेच तिथीनुसार श्रीशिवजयंती आंग्ल दिनांक १७ मार्च २०२५ रोजी म्हसळा शहरात उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

गेली तेरा वर्षे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून म्हसळा शहरात शिव मशालज्योत आणली जाते तसेच पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिवपालखी मिरवणूक सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान हे शिवविचारांवर चालणारे प्रतिष्ठान आहे. किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यासाठी म्हसळा शहरातील सुमारे ३० तरुण ह्यामध्ये सहभागी झाले होते. गेली अनेक वर्ष गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा तर्फे अनेक उपक्रम राबविले जात असून म्हसळा तालुक्यांतील शिवविचारांचा जागर करण्यात प्रतिष्ठानचा फार मोठा वाटा असतो.

     कुमार स्वामी म्हशिलकर २८ किलोमीटर तर श्री अंकित राजपूत, श्री प्रसन्न निजामपूर आणि कुमार ऋषी यांनी जवळजवळ १४ किलोमीटरचे अंतर शिवज्योत हातामध्ये धरून पायी धावण्याचा शिवपराक्रम केला. शिवज्योत म्हसळा शहरात आगमन झाल्यानंतर शिवज्योतीचे स्वागत म्हसळा दिघी नाक्यावर म्हसळा नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री. संजयजी कर्णिक, शिवसेना तालुकप्रमुख श्री प्रसादजी बोर्ले, श्री प्रविण उर्फ बाबू बनकर (शिवसेना उपतालूकाप्रमुख), श्री सुरेशजी कुडेकर (शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख), श्री कौस्तुभजी करडे (युवसेना तालूका अधिकारी), म्हसळा पोलीस स्टेशनचे श्री राठोड साहेब, पत्रकार श्री बाबूजी शिर्के, पत्रकार श्री संतोषजी उद्धारकर यांनी केले तसेच संध्याकाळी ५ वाजता तांबट आळी, म्हसळा येथून मिरवणूकीस प्रारंभ झाला. शिवपालखीच्या प्रथम पूजेचा मान म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कहाले यांना दिला होता. तसेच समीरजी बनकर (हिंदू संघटना म्हसळा तालुका अध्यक्ष) यांनी शिवपालखीला प्रथम खांदा देऊन मिरवणूकीस प्रारंभ केला.

        तसेच यंदा पहिल्यांदा शिवजयंतीला महाडचे शिवतांडव ढोल, ताशा पथकाच्या गजरात, भगवे ध्वज नाचवत, जय भवानी – जय शिवाजी, हर हर महादेवच्या उत्तुंग घोषणा शिवजयंती साजरी करण्यात आली. संयुक्त शिवसेना म्हसळा तालूका आणि गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे भव्य शिव-मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक मराठी वेशभूषा करीत महिला मंडळ अतिशय उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. पत्रकार निकेशजी कोकचा याने छत्रपती श्री शिवाजी महाराजांची हुबेहूब वेशभूषा आणि कु. पार्थ गोविलकर आणि कु. अथर्व नटे यांनी मावळ्यांची वेशभूषा करून
कार्यक्रमाला अधिक शोभा आणली होती. श्रीवर्धन येथील कराटे, मनोरे, साहसी खेळांचे प्रत्यक्षिते दिघी नाक्यावर करण्यात आले. शिवज्योत, शिवपालखी व शिवमिरवणूक सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री सचिन करडे, श्री प्रसाद बोर्ले (शिवसेना म्हसळा तालुकाप्रमुख) श्री प्रविण उर्फ बाबू बनकर (शिवसेना उप तालूकप्रमूख) श्री स्वप्निलजी चांदोरकर (युवासेना तालूका अधिकारी), श्री पवनजी भोई (शिवसेना शहरप्रमूख), श्री संतोषजी कुडेकर (शिवसेना उबाठा तालूकाप्रमूख) श्री कौस्तुभजी करडे (युवासेना तालूका अधिकारी) श्री विशालजी सायकर (शिवसेना उबाठा शहरप्रमूख), प्रितम धिमर, मयुरेश करडे, राहूल पोतदार, प्रसन्न निजामपूरकर, सुशील यादव, अभय कळमकर, सुजित वेदक, निहार बनकर, श्रीयन करडे, श्लोक करडे, श्रेया करडे यांनी प्रयत्न केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!