कोथरूडमध्ये ‘डॉ. सुपेकर फॅमिली केअर क्लिनिक’चे भव्य उद्घाटन – स्थानिकांना दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
पुणे :प्रतिनिधी
कोथरूड, चांदणी चौक, भुसारी कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सौ. डॉ. स्वप्ना राजेश्वर सुपेकर यांच्या डॉ. सुपेकर फॅमिली केअर क्लिनिकचे उद्घाटन सोमवारी उत्साहात पार पडले.
उद्घाटन पुणे येथील प्रसिध्द औषध विक्रेते श्री. प्रदीप सुपेकर व सातारा जिल्हा शिंपी समाज जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या क्लिनिकच्या माध्यमातून स्थानिक रुग्णांना दर्जेदार, सुलभ व वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असा विश्वास प्रमुख पाहुणे श्री. प्रदीप सुपेकर यांनी व्यक्त केला.
समारंभास साताराचे माजी सिव्हिल सर्जन डॉ. गढीकर, सौ. डॉ. गढीकर, सौ. स्मिता सुपेकर, सौ. सुवर्णा पोरे, शिवाजी इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. राजेश्वर सुपेकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले.
स्थानिक नागरिकांकडून नव्याने सुरू झालेल्या या क्लिनिकचे मनापासून स्वागत करण्यात आले असून, आरोग्य सेवेत नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.