नामदार जयकुमार गोरे (भाऊ) यांचा भव्य नागरी कृतज्ञता सन्मान सोहळा रविवार, ११ मे रोजी रांजणीत होणार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (ता. माण) –
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते जलनायक, नामदार मा. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांचा भव्य नागरी कृतज्ञता सन्मान सत्कार सोहळा रविवार, दि. ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता रांजणी येथे होणार आहे.
हा कार्यक्रम ममता स्मृती, नानासाहेब दोलताडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला असून, हा सोहळा ग्रामस्थांच्या तसेच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी मार्डी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, मान्यवर व स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
जयकुमार गोरे (भाऊ) यांनी माण-खटाव भागासाठी केलेल्या विधायक कामगिरीसाठी व स्थानिक विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा नागरी सन्मान देण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या भागातील रस्ते, पाणी योजना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी घडली असून, या सर्वच कार्यांचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे.
आपण सर्वांनी या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन
भारतीय जनता पार्टी, मार्डी जिल्हा परिषद गटाने केले आहे

