गोपालकृष्ण विद्यालय,गोंदवले खुर्द या प्रशालेत संविधान दिन उत्साहात संपन्न
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सादिक शेख प्रतिनिधी
गोंदवले खुर्द :
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द तालुका – माण, जिल्हा – सातारा विद्यालयात संविधान दिना निमित्त विविध प्रकारचे अनेक उपक्रम घेण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री नदाफ एन. डी. सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विदयार्थी, विद्यार्थीनींनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. विद्यालयातील मुख्याध्यापक,
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी विद्यार्थीनींनी सर्वप्रथम संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यानंतर कु. प्रितम हणमंत फाळके इ. ८ वी तील विद्यार्थीनीने संविधानाचे महत्त्व या विषयावर इंग्रजीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर संविधान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी होते. सर्व कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील कलाशिक्षक तसेच आर.एस.पी. शिक्षक श्री.सादिक शेख सर यांनी केले.

संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा, घेण्यात आली. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.नदाफ सरांनी संविधान दिनानिमित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निबंध स्पर्धेचे आयोजन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. उगलमोगले सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी मुख्याध्यापक श्री.नदाफ सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सादिक शेख सर, श्री.उगलमोगले सर, श्री. जाधव सर, श्री.माने सर, श्री. घोडके सर,सौ. शेडगे मॅडम, श्री. दयानंद जगदाळे सर, श्री. घाटगेअण्णा, श्रीमती अवघडे मॅडम या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार विद्यालयातील श्री.दिनेश जाधव सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.