गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय सातारा (पाटखळ माथा ) येथील आजी-माजी विद्यार्थी संघातर्फे कलाकार्यशाळा
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख(पोलीसटाइम्स रिपोर्टर )
गोंदवले खुर्द :
गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय सातारा (पाटखळ माथा ) येथील आजी-माजी विद्यार्थी संघातर्फे कलाकार्यशाळा घेण्याचे प्राथमिक नियोजन माहे मे च्या सुरवातीस करण्यात आले होते यानुसार ही कार्यशाळा मान्यवर चित्रकार मार्गदर्शक श्री गजानन कबाडे (मुंबई )यांच्या मार्गदर्शनाखाली बामणोली येथे पार पडली
या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने नियमित निसर्ग चित्र, त्यातील घेता येणारे स्वातंत्र्य व या घेतलेल्या स्वातंत्र्यातून पुढे निर्माण होणारी रचनाकृती (कांपोझिशन ) अशा पद्धतीने दोन दिवसाच्या एकूण कार्यकाल विचारात घेता या कार्यशाळेचे आयोजन व नियोजन केले गेले होते या कार्यशाळेत कला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आज महाविद्यालय 27 व्या वर्षात पदार्पण करत आहे या कालावधीत विविध विद्यार्थी कलाशिक्षक, चित्रकार, कलादिग्दर्शक,अॅनिमेटर, बि.जी. आर्टिस्ट,ग्राफीक डिझायनर, फोटोग्राफर तसेच कलेच्या संलग्न विभागांमध्ये स्थिरस्थावर झालेले आहेत, तरीही नियमित चित्रनिर्मिती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे या दृष्टीने या कार्यशाळेचे नियोजन म्हणजेच -री कनेक्ट विथ आर्ट -या नावाने केले गेले होते यासाठी बामनोली येथील ” तरवा ” -येथे निवास व्यवस्थेसह पूर्ण दोन दिवसाचा कालावधी विचारात घेऊन सर्व सुविधांसह ही कार्यशाळा पार पडली यामध्ये कलाशिक्षक – सादिक शेख, मनीषा मोरे , विवेक जाधव तसेच चित्रकार मनीषा डफळे, रोहिणी पाटील, निलक्षी घोणे, नंदा ढोणे, गिता छाडवा यांनी आपला सहभाग नोंदवला या कार्यशाळेचे आयोजन कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विजयकुमार धुमाळ व गणेश ढाणे, स्मिता ढाणे, अभय जाधव सर्व सहकारी कर्मचारी वर्ग यांनी केले होते. अशा कार्यशाळा वारंवार घेतल्या जाव्यात व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच आजचे विद्यार्थी यांना अशा विविध कला निर्मिती संलग्न उपक्रमांचा अभ्यास व आनंद घेता यावा हाच या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता यानुसार भविष्यातही अशा विविध संकल्पनांशी संलग्न कार्यशाळांचे आयोजन करावे ही अपेक्षा आजी-माजी विद्यार्थी संघ यांनी व्यक्त केली , व ही कार्यशाळा संपन्न झाली. भविष्यात या कार्यशाळेतील निर्मित चित्रांचे प्रदर्शन करण्याचा मानस या सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.