गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी
व्हिजन २४ तास न्यूज चॅनल
गणेश तळेकर
मुंबई
हरहुन्नरी ऋषिकेश जोशी, आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने कमालीचे लोकप्रिय आहेत. सोबत त्यांनी लेखक आणि दिगदर्शक म्हणूनही मनोरंजनसृष्टीवर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सध्या मात्र एका वेगळ्याच कारणाने ते प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत. गोल्डमॅन म्हणून सध्या ते सगळीकडे वावरतायेत. त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे त्यांना ही आवड कधी निर्माण झाली ? हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.
आगामी ‘पाणीपुरी’ या चित्रपटातील ‘बबन’ ही व्यक्तिरेखा ऋषिकेश जोशी साकारत असून या बबनला अंगावर दागिने घालून मिरवण्याची हौस आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.


