व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) विटा प्रतिनिधी
विटा येथील नवजीवन संशोधन व विकास संस्था, इपिका डॉट इन आणि सक्षम फिल्म कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोल्डन सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच संपन्न झाला. या महोत्सवामध्ये ‘निबार’ या मराठी चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून याच चित्रपटातील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेता शशांक शेंडे हे ठरले आहेत. ‘मार्ग माझा एकला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सतिश रणदिवे यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर या चित्रपटातील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांनी आपली मोहर उमटवली आहे. गोल्डन सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे. सदर मराठी चित्रपट महोत्सव संत गाडगेबाबा सभागृह, बळवंत महाविद्यालय विटा येथे दिमाखात संपन्न झाल्याची माहिती चित्रपट महोत्सवाचे संस्थापक, दिग्दर्शक व आयोजक दिलीप भोसले, दिग्दर्शक के.के. माने यांनी दिली. या महोत्सवामध्ये राज्यभरातून व बाहेरच्या राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट : निबार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सतिश रणदिवे, सर्वोत्कृष्ट अभिनेता : शशांक शेंडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : वर्षा उसगांवकर, सर्वोत्कृष्ट लघु चित्रपट : वणवा, सर्वोत्कृष्ट लघु चित्रपट दिग्दर्शक : हालबे, सर्वोत्कृष्ट लघु चित्रपट अभिनेता : डॉ. प्रमोद कसबे, सर्वोत्कृष्ट गीतकार : निलेश बारसिंग, सर्वोत्कृष्ट गायिका : उर्मिला धनगर असे पुरस्कार देण्यात आले. गोल्डन सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवप्रसंगी लेखक, दिग्दर्शक प्रा. बालाजी वाघमोडे, चंदू कोंडीबा शिकलगार, सुनील जगदाळे, निवेदक आनंद हाबळे, अँड. अधिक जाधव, हसिना मुल्ला, कुमुदिनी मधाळे, शितल भोसले, दिग्दर्शक राहुल गुरव, पत्रकार अशोक सुतार, प्रा. चंद्रकांत हुलगे, जहिर मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते