वाघमोडेवाडी आणि पिंगळी बुद्रुकमध्ये उघड्यावरून शेळ्या-करड्यांची चोरी; ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
दहिवडी – प्रतिनिधी
माण तालुक्यातील वाघमोडेवाडी आणि पिंगळी बुद्रुक या दोन ठिकाणी उघड्या गोठ्यांतून व शेडमधून एकूण रु. ३३,०००/- किमतीच्या शेळ्या आणि करड्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 जुलै 2025 रोजी रात्री 1.40 ते पहाटे 3.30 या वेळेत, वाघमोडेवाडी येथे राहणारे फिर्यादी चैतन्य सुभाष मडके (वय ३१) यांच्या घरासमोर उघड्या गोठ्यातून व त्यांचे पाहुणे माधवराव कोंडीबा कोकरे (रा. कोकरेवाडी, पिंगळी बुद्रुक) यांच्या उघड्या शेडमधून चोरट्यांनी शेळ्या व करडे चोरून नेले.
चोरीस गेलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे:
दोन अडीच वर्षे वयाच्या काळ्या रंगाच्या शेळ्या – रु. १२,०००/-,दोन सहा महिन्याचे करडे – रु. ६,०००/-,तीन वर्षे वयाच्या दोन काळ्या रंगाच्या शेळ्या – रु. १२,०००/-एक सहा महिन्याची पाट – रु. ३,०००/-,एकूण रु. ३३,०००/- किमतीचा पशुधन चोरट्यांनी लंपास केला आहे. सदर घटनेची नोंद 24 जुलै 2025 रोजी दुपारी 12.53 वाजता दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली,पो.ह. आर.पी. खाडे हे करीत आहेत.