स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माणदेशी महिला बँक व माणदेशी फाउंडेशनच्या वतीने अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांचा सन्मान करण्यात आला. माणदेशी बँकेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात माणदेशी महिला बँकेच्या अध्यक्षा सौ. चेतनाजी सिन्हा यांच्या हस्ते नितिन दोशी यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि सेवाभावी कार्याबद्दल हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात अहिंसा पतसंस्थेला ‘दिपस्तंभ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कॉसमॉस बँकेचे चेअरमन श्री. मिलिंद काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास माणदेशी महिला बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रेखा कुलकर्णी, संचालिका सौ. राजश्री दोशी, सौ. राणी बनगर, सौ. अनघा कामत-सिन्हा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे माण-खटावचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, सौ. वनिता पिसे, सौ. कोरे मॅडम, जवाहर देशमाने, अहिंसा पतसंस्थेचे संचालक विजय बनगर यांच्यासह बँकेचे असंख्य सभासद, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.