अभ्यासाबरोबर खेळायला महत्व द्या…. ……….. मीना निंबाळकर बाबर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड…..प्रतिनिधी
शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती निकोप राखण्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळाला महत्त्व द्या असे आवाहन म्हसवडच्या अपर तहसीलदार मीना निंबाळकर बाबर यांनी म्हसवड येथे केले.


क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथील पावसाळी क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ अप्पर तहसीलदार मीना निंबाळकर बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते. यावेळी बोलताना तहसीलदार निंबाळकर म्हणाल्या आजची युवा पिढी सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी अभ्यासाबरोबरच त्यांचा खेळातील सहभाग वाढविणे महत्त्वाचे आहे. विशेषता त्यासाठी मैदानी स्पर्धा अधिक महत्त्वाच्या आहेत. निरोगी शरीर हीच आपली खरी संपत्ती असून त्यासाठी विविध प्रकारच्या मैदानी खेळामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे. आज सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. स्पर्धेतील विजेतेपद मिळवण्याबरोबरच त्यामधील सहभाग सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. जय पराजय हा गौण भाग आहे. खिलाडूपणा , सांघिकपणा हे मैदानी क्रीडा स्पर्धेचा मानबिंदू आहे. मोबाईल व टीव्ही चा अतिरेकी वापर टाळा. जीवनात नेहमी सकारात्मक राहून जिद्द चिकाटीने वाटचाल करा. क्रिकेट खेळातून घडलेल्या भारतरत्न सचिन तेंडुलकर तसेच माण तालुक्याची सुकन्या व ऑलम्पिक खेळाडू ललिता बाबर यांचा आदर्श ठेवून आपली खिलाडी वृत्ती वाढवा त्यांच्याकडून प्रोत्साहन व प्रेरणा घ्या . आई वडील, गुरुजन यांचा मानसन्मान ठेवा असे आवाहन तहसीलदार निंबाळकर यांनी केले. क्रांतिवीर शाळा एक उपक्रमशील व आदर्श व्यवस्थापन असलेली शाळा असल्याचे एकंदरीत कामावरून दिसून येत आहे.अल्पावधीत नावारूपाला आलेल्या क्रांतिवीर शाळेला उज्वल भविष्य असल्याचेही त्याने स्पष्ट केले. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन खेळाडू वृत्ती जोपासण्याचे आवाहन तहसीलदार निंबाळकर यांनी केले.
प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केले. यावेळी विविध मैदानी खेळ, त्यामधील खेळाडूंची संख्या , सर्व विद्यार्थी सहभाग, विद्यार्थ्यांमधील विभागून केलेले गट इत्यादी बाबत सुलोचना बाबर यांनी माहिती दिली.
सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार उपशिक्षक अनिल काटकर यांनी व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *