म्हसवडच्या कन्यांचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णसोहळा!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड
नुकत्याच पवनी, जिल्हा भंडारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेत म्हसवडच्या दोन विद्यार्थिनींनी अभूतपूर्व कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. मानदेश मर्दानी स्पोर्ट्स & मार्शल आर्ट अकॅडमी, म्हसवड च्या या खेळाडूंनी आपल्या उत्तुंग कामगिरीने केवळ आपल्या प्रशालेचे नव्हे, तर संपूर्ण म्हसवड गावाचे नाव राज्यभर झळकवले आहे.

सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड ची विद्यार्थिनी कु. धनश्री बंडोपंत लोखंडे हिने 14 वर्षांखालील गटात, 28 किलो वरील वजन गटात तसेच हस्तकला क्रीडा प्रकारात अत्यंत कौशल्यपूर्ण खेळ करत सुवर्णपदक मिळवले. तिच्या जिद्दीमुळे आणि अथक मेहनतीमुळे तिने या स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मेरी माता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड ची विद्यार्थिनी कु. रचना महादेव साळुंखे हिने 17 वर्षांखालील गटात, 39 ते 43 किलो वजन गटात आणि हस्तकला क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तिच्या अप्रतिम खेळाने तिने राज्यभरातील प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजय मिळवला.


या दोन्ही विद्यार्थिनींना मुख्य प्रशिक्षक बंडोपंत लोखंडे सर तसेच प्रशिक्षक संतोष लांब आणि दिग्विजय माने यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थिनींचे सिद्धनाथ हायस्कूलचे प्राचार्य प्रवीण दासरे सर, देशमुख सर, नलवडे सर, माने सर, खांडेकर मॅडम आणि मेरी माता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य फादर सनू व क्रीडा शिक्षक आकाश गुजरे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

म्हसवडच्या या खेळाडूंच्या विजयामुळे गावात आनंदाचे वातावरण असून, दोन्ही विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या विजयामुळे म्हसवडचे नाव पुन्हा एकदा राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रात उजळले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!