म्हसवड :- नुकतीच सातारा जिल्हातील शिंपी समाज बांधवांना जिल्हा अध्यक्ष इंजि सुनील पोरे व सहकारी यांचे संकल्पनेतून समाजाचे दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पंजाबातील कार्य पाहणे व दर्शन घेणेसाठी जिल्ह्यातील पन्नास महिला व पुरुष असा ग्रुपने गेला होता त्यावेळी घुमान येथील नामदेव मंदिर ट्रस्टचे वतीने सातारा जिल्ह्यात इंजि पोरे करीत असलेले सामाजिक कामाची मह्ती ऐकुन प्रभावित होऊन पंजाब येथील ट्रस्टचेवतीने सपत्नीक सत्कार करणेत आला
यावेळी झालेले कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील महिलांनी सौ रेखा हेन्द्रे व सौ सुवर्णा पोरे यांचे मार्गदर्शनाखाली नामदेव जीवनावरील नाटिका हिंदीतून सादर केली तिला तेथील प्रेक्षकांनी दाद दिली सुत्रसंचलन पत्रकार सुभाष भांबुरे यांनी केले तर आभार सौ राजलक्ष्मी करण पोरे यांनी मानले यावेळी गेलेले ग्रुपने घुमानसह अमृतसर वाघाबॉर्डर वैष्णोदेवी आदि स्थळाना भेटी दिल्या व यात्रा आयोजनाबद्दल इंजि सुनील पोरे सुभाष भांबुरे याना अनेकांनी धन्यवाद दिले…