घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करुन चोरीस गेलेले मालापैकी १,६६,५८० मुद्देमाल व गुन्हयात वापरेलेली पिकअप गुन्हयाचेकामी जप्त स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई
सादिक शेख
गोंदवले खुर्द ; प्रतिनिधी
दिनांक १०/०१/२०२३ रोजीचे २३.०० ते ११/०१/२०२३ रोजीचे सकाळी ०९.०० वा. सुमारास फिर्यादी यांचे महाबळेश्वर येथील काम चालु असले घरातुन अज्ञात चोरटयांनी २,२९,००० /- रुपये किंमतीचे पॉलीकॅब वायर,कटर मशिन, ड्रील मशीन, अॅल्युमिनीयम व प्लंबीग साहित्य चोरी करुन नेलेबाबत दिले फिर्यादीवरुन महाबळेश्वर पोलीस स्टेशन गुरनं ०३/२०२३ भादविंसक ४५४,४५७,३८० गुन्हा नोंद करण्यात आलेला होता
. नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरचा गुन्हा उघड करणेबाबत श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उप निरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आलेले होते. दिनांक १९/०१/२०२३ रोजी अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, देगाव फाटा सातारा येथे २ इसम पिकअप जीप मधुन चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यापैकी एकाने काळा पांढरा चौकड शर्ट व काळी पँट घातलेली आहे. पिकअप गाडीवर ओम साई ट्रेडर्स असे लिहलेले आहे. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकास नमुद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या तपास पथकाने देगाव फाटा सातारा येथे जाऊन पिकअप वाहन व त्यातील इसमांना मुद्देमाल पॉलीकॅब वायर, कटर मशिन, ड्रील मशीन, अॅल्युमिनीयम व प्लंबीग साहित्य ताब्यात घेऊन त्यांचेकडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेले माला पैकी १,६६,५८०/- मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली ४,००,०००/- रुपये किंमतीची पिकअप जीप क्रमांक एमएच ११/टी १५२१ असा एकुण ५,६६,५८०/ माल- जप्त करणेत आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत हे करीत आहेत. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, पो. नि. संदीप भागवत महाबळेश्वर पो.स्टे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उप निरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील पोलीस अंमलदार सफौ उत्तम दबडे, तानाजी माने पोहवा. अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, विश्वनाथ संकपाळ, अजित कर्णे, प्रविण कांबळे, शिवाजी भिसे, स्वप्निल माने, अमोल माने, प्रविण पवार, केतन शिंदे व महाबळेश्वर पो.स्टे. पो.कॉ. नवनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. सर्वांचे अभिनंदन मा. श्री. समीर शेख पोलिस अधिक्षक सातारा मा.श्री. बापू बांगर अपर पोलिस अधिक्षक सातारा यांनी केले.