आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणूकांच्या कामाला लागा -संजय भोसले*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

BY ; Ahmad Mulla

म्हसवड 

                       आगामी जिल्हा परिषदा व पंचायत समित्या तसेच नगरपरिषदांच्या निवडणूकांचे बिगूल कोणत्याही  क्षणी वाजेल तरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी आत्ता पासूनच सजगपणे कामाला लागा असे आवाहन  माण-फलटन-खटाव पदाधिकार्‍यांची दहिवडी येथील बैठकी प्रसंगी संजय भोसले यांनी केले.
सदर बैठकीस फलटन उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे,फलटन तालुकाप्रमुख विकास नाळे,माण तालुका संघटक रामभाऊ जगदाळे,तालुका प्रमुख मदने,तालुका संघटिका सौ.जाधव,खटाव संघटिका सलमा शेख,युवा अधिकारी आवळे पाटील व सर्व उप तालुका प्रमुख ,विभाग प्रमुख प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      याप्रसंगी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे  यांच्या पाटण मधील सभेच्या नियोजनावर चर्चा करुन पाटणच्या सभेला या विभागातून मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भोसले यांनी केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!