मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याने अंत्य उल्लेखीनय काम केले आहे. या योजनेचे 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. दि. 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा प्रत्येकी प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत सुमारे 50 हजार महिलांचा मेळावा रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे.
या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. याचवेळी प्रातिनिधीक स्वरुपात लाडक्या बहीणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना राखीही बांधणार आहेत.
सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरीचे प्रमाण 98.02 टक्के इतके आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन झटत आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे हे महिलांसाठी असणाऱ्या योजनांबाबत संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केले आहे.