वैशाली ताई मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली गाव चलो अभियान हनुमान वाडी मध्ये संपन्न.
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
उंब्रज कराड:प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कराड उत्तरमहिला मोर्चा उपाध्यक्ष सौं वैशालीताई मांढरे यांनी हनुमानवाडी या गावामध्ये गाव चलो अभियान राबविले.केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने भारताचे मुकुटमणी आपले लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशामधून गाव चलो अभियान राबविले जातं आहे त्यानिमित्ताने कराड उत्तर मध्ये प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी गावोगाव केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती व केंद्र सरकारच्या वतीने लाभार्थी आहेत त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
आलेल्या योजना त्यांचपर्यंत पोचतात का योजना मिळाल्यानंतर लाभ त्यांना दिला जातो का? जे लाभार्थी आहेत त्यांना मिळालेल्या लाभातून ते समाधानी आहेत का? या सर्व गोष्टीची पडताळणी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केली. वैशालीताई यांनी काही शेतमजूर महिला व पुरुष यांना बऱ्याच शासकीय योजनाची माहिती दिली व त्यांना त्याचा लाभ जरूर घ्यावा ही कळकळीची विनंती ही केली व नरेंद्र मोदी साहेबांनी तुमच्या संसारा साठी छोट्याश्या काडीचा आधार देऊ केला आहे. त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमची प्रगती करा अशी त्यांनी सांगितले फुकट रेशनींग मिळत असल्या कारणाने गरीबाच्या झोपडीत सुद्धा चूल पेटाय लागली आहे.सर्वसामान्य लोकांचे धान्य घेण्याचे पैसे वाचू लागले आहेत.शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्यसरकार दोन्हीकडूनही किसान निधी योजने आंतर्गत 12000रुपये मिळायला लागले.त्यामुळे शेतकऱ्याला शेतीत भांडवलासाठी मदतही झाली आहे. या गोष्टी वैशालीताईंनी हनुमानवाडीकरांना समजाऊन सांगितल्या.आणि या योजना पटवून सांगण्यासाठी ग्रामस्थ मंडळी नां एकत्र आणण्याचं मोलाचं कार्य हनुमानवाडीचे माझी आदर्श सरपंच पुरस्कार, निर्मलग्राम राष्ट्रपती पुरस्कार, विमाग्राम पुरस्कार,सोसायटी चेअरमन, असे अनेक पुरस्कार घेतलेले आपले सरपंच श्री बाळासो उर्फ अरुण आनंदराव शिंदे सरकार यांची मोलाची मदत झाली.अरुण शिंदे यांनी गावाकऱ्यांना कुठेही अडचण येईल तिथे मी कायम तुमच्या पाठीशी असेन असा शब्दही दिला.सांगितलेल्या सर्व योजनांनमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.