वडजल ता.माण येथे ठार मारण्याच्या उद्देशाने वेटरला मारहान दोघाना अटक एक फरार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड
वडजल ता माण येथे मनोज बाळू काटकर यास ठार मारण्याच्या उद्देशाने तीन जनानी हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची फिर्याद सौ.सिमा मनोज काटकर रा  वडजल यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली या  प्रकरणी म्हसवड पोलीसांनी दोन आरोपीना अटक केली असून तिसरा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
याबाबत म्हसवड  पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
शुक्रवार दि.७ रोजी फिर्यादी सौ सिमा काटकर यांचे  पती मनोज बाळु काटकर वय ३९वर्षे रा.वडजल ता.माण जि.सातारा हे वडजल येथील  हाँटेल प्रथमेश ढाबा येथे  वेटरचे काम करत असून  दुपारच्या वेळेस     छोट्या उर्फ निखील संजय काटकर  ,करण कालिदास काटकर   ,गणेश काटकर  सर्व     रा.कुकुडवाड ता.माण जि.सातारा व एक अनोळखी इसम  ढाब्यावर येऊन बसले ते बसलेल्या टेबल वरती टेबल पुसत असताना .त्या टेबल वरती  बसलेल्या ,करण कालिदास काटकर     हा फिर्यादीचे  पती मनोज काटकर यांना तु माझ्या टेबलला हात का लावला तु मला ओळखत नाही का ? मी कोन आहे ?तुला आता जिवंत ठेवतच नाही असे म्हणाला तेवढ्यात  छोट्या उर्फ निखील काटकर याने मनोज काटकर यांना धरले आणि करण काटकर याने टेबल वर असलेली काचेची बाटली फिर्यादीचे  पती मनोज यांचे डोक्यावर फोडुन त्याच फुटलेल्या बाटलीने त्यांचे गळ्यावर ,कानाजवळ  मारले व गणेश काटकर यांनी फिर्यादीचे  पतीस शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्याने मारहान केली व  जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.म्हणुन त्यांचे विरूद्ध सौ सिमा काटकर यांनी म्हसवड पोलीस ठाण्या तक्रार दिली . म्हनून वगैरे मजकूरचे खबरी वरून गून्हा रजिस्टरी दाखल करुन म्हसवड पोलीसा़ंनी त्वरीत हालचाल करुन तिन पैकी  छोट्या उर्फ निखिल काटकर,करण काटकर या दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी  गणेश काटकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि विशाल भंडारे करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!