मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी 
    मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या मार्गदर्शनानुसार  म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी माण तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांचे उपस्थितीत करण्यात आली.
    सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडे आकरा वाजे पर्यंत म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी माण तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, वैद्यकीय अधिकारी भारत काकडे,  वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहल सरगर   मॅडम, खांडेकर लॅब टेकनेशिंयन, सुजाता खाडे,प्रशांत तायडे, दिपक पवार,अजित लिटे,संजय शिरोडा, लक्ष्मण लोखंडे, खताळ आदी रुग्णालयातील कर्मचारी यांचेकडून पत्रकारांच्या प्रत्येकी विविध आठ प्रकारच्या तपासण्या   करण्यात आल्या
     यावेळी पत्रकार  एल के सरतापे, विजय टाकणे, सचिन मंगरुळे,अहमद मुल्ला, नागनाथ डोंबे, केराप्पा काळेल, शहाजी लोखंडे, सचिन सरतापे, अनिल पिसे, आबा शिंदे आदी प्रिंट मिडिया व ओंनलाईन मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते
या शिबिरामध्ये रक्तदाब, ईसीज रक्ताच्या तपासण्या, शुगर, थायरॉईड कोलेस्टेरॉल, आदी तपासण्या करण्या आल्या. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी  यांनी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्तम सहकार्य केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!