सहकार गणेश मंडळ आणि मानदेशी हेल्थसेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सहकार गणेश मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, इतर खर्चांना बगल देत मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहे. यामुळे मंडळाने शहरात अव्वल स्थान मिळवले आहे.
मंडळाचे अध्यक्ष अक्षय धट आणि संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली यावर्षीही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले, तर सोमवारी मानदेशी हेल्थसेंटरच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र मोडासे, डॉ. राऊत, डॉ. खोत, डॉ. हसूमती छेडा, रोहित होळ, सारंग लोंढे, पत्रकार अहमद मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, शिरकुळे मॅडम, हांगे मॅडम आणि भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मंगळवारी हाडांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सहकार गणेश मंडळाच्या या सामाजिक कार्याची अनेक मान्यवरांनी प्रशंसा केली असून, मंडळाचे अध्यक्ष अक्षय धट, उपाध्यक्ष प्रतीक ओतारी, सुरज पवार, सिद्धनाथ कवी, रणजित लोखंडे आणि म्हसवड शहर राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष अनिल लोखंडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.