सातारा जिल्हा पोलीस दलाच्या ‘उंच भरारी’ योजनेअंतर्गत मोफत रोजगार प्रशिक्षण सुरू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक अहमद मुल्ला )

सातारा:

सातारा जिल्हा पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उंच भरारी’ योजना अंतर्गत रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात १४ फेब्रुवारी २०२५ पासून होणार आहे.

या योजनेअंतर्गत विविध तांत्रिक प्रशिक्षण कोर्सेस मोफत दिले जाणार आहेत, जेणेकरून युवकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतील.

प्रशिक्षण उपलब्ध असलेले कोर्स:

1. असिस्टंट इलेक्ट्रीशन (हाऊस होल्ड वायरिंग व सोलर)

प्रशिक्षण स्थळ: प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, भोर (जि. पुणे)

कालावधी: ४५ दिवस
2. दुचाकी रिपेअरिंग – टु व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन

प्रशिक्षण स्थळ: प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, लोहगाव (पुणे)

कालावधी: ४५ दिवस
3. चार चाकी रिपेअरिंग – फोर व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन

प्रशिक्षण स्थळ: प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, लोहगाव (पुणे)

कालावधी: ४५ दिवस
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये:

✅ संपूर्ण प्रशिक्षण मोफत
✅ निवास व भोजनाची मोफत सोय
✅ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र
✅ नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी

नोकरी मिळाल्यानंतरचे संभाव्य मानधन:

₹७,५००/- ते ₹१८,०००/-

अर्ज करण्यासाठी पात्रता:

वय: १८ ते ३० वर्षे शिक्षण: किमान १० वी उत्तीर्ण
आवश्यक कागदपत्रे:

1. आधार कार्ड
2. १० वी पास प्रमाणपत्र
3. जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
4. चार पासपोर्ट साईज फोटो (सर्व कागदपत्रांच्या ३ झेरॉक्स प्रती)
नोंदणी करण्याची प्रक्रिया:

इच्छुक उमेदवारांनी स्वतःच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून नाव नोंदणी करावी.

प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवासाची व्यवस्था:

शिवतेज हॉल, सातारा तालुका पोलीस स्टेशन येथून प्रशिक्षणस्थळांवर पाठविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

विनोद राजे: ९९२३२३१०९०

संभाजी काटकर: ९५५२५९२३६९

सातारा जिल्हा पोलीस दल – सदरक्षणाय खलनिग्रहणाय

नमूद कोर्स करिता गरजू असलेल्या मुलांनी त्वरित दहिवडी पोलीस स्टेशनची संपर्क करावा असे आवाहन सपोनि अक्षय सोनवणे यांनी केले आहे 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!