पुण्याच्या व्यापाऱ्याकडून माण मधील उद्योजकाची फसवणूक ;१०जणावर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
पुण्यातील एका व्यावसायिकाने माण तालुक्यातील एका उद्योजकाची आयात निर्यातच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून. याबाबत दशरथ मच्छिंद्र कोकरे (वय ४०, रा. बनगरवाडी , ता.माण , सातारा ) यांनी मनोज लुंकड , सौ.सुरेखा लुंकड , दर्शना लुंकड , अनिल बन्साली , अल्पेश बन्साली , नरेंद्र धोका , सोनल धोका , निजामुद्दीन शेख , राजश्री कुक्कडवाल , विजय नवलखा या १० जणाविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे
याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दशरथ कोकरे यांचा सीमाशुल्क विभागाचा जप्त केलेला माल , सरकारकडून घेऊन त्याचा कर भरुन तो माल खुल्या बाजारात विकण्याचा व्यवसाय आहे व आयात निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. वरील सर्व संशयित एकमेकांचे नातेवाईक व मनोज लंकड यांचे कर्मचारी आहेत. पुणे येथील मनोज लंकड यांचे अनेक निरनिराळे व्यवसाय आहेत त्याचबरोबर व्याजाचा व्यवसाय आहे. त्यासंदर्भात दशरथ कोकरे यांनी मनोज लंकड यांच्याकडे पैशाबाबत कराराची मागणी केली परंतु संशयित मनोज लंकड यांनी करार करून दिला नाही. फिर्यादीस संपुर्ण पैसे बॅकेद्वारे देण्याचे ठरले. मनोज लंकड यांनी संशयितांच्या निरनिराळ्या खात्यावरुन २२ कोटी ५४ लाख ५० हजार एवढी रक्कम फिर्यादी दशरथ कोकरे यांच्या खात्यावर वर्ग केली होती. सदर रक्कमेच्या परताव्यात पोटी २७ कोटी ५४ लाख ५० हजार एवढी रक्कम मुद्दल व व्याज म्हणून परत देण्याचे होते. परंतु लबाड्या करून संशयित राजश्री कुक्कडवाल हिने संशयित मनोज सलुंकड , सौ.सुरेखा लुंकड , दर्शना लुंकड , अनिल बन्साली , अल्पेश बन्साली यांच्याशी संगनमत करून निजामुद्दीन शेख व स्वतः राजश्री कुक्कडवाल यांच्या खात्यावरून २६ कोटी ५२ लाख ७५ हजार ७०० रुपये वर्ग केले आहेत. त्याचबरोबर सर्व संशयितांनी फिर्यादी दशरथ कोकरे यांचेकडून ७ कोटी ९० लाख ८८ हजार ४११ रुपयांचा माल खरेदी घेतला आहे. त्याचबरोबर निजामुद्दीन शेख यांच्या खात्यावर ५४ लाख ७२ हजार तसेच राजश्री कुक्कडवाल हिच्या खात्यावर १२ लाख ९३ हजार १०० रुपये व्याचा पोटी वर्ग करून घेतले आहेत. त्याचबरोबर मनोज लंकड यांच्या सांगण्यावरून श्री महेन्द्र सुंदेचा यांना ७५ लाख रुपये दिले आहेत. ३५ कोटी ८६ लाख २९ हजार २११ एवढी रक्कम परत देण्याचे होते. परंतु ७ कोटी ३१ लाख ७९ हजार २११ रूपये एवढी रक्कम संशयितांकडून येणे आहेत. परंतु ती सर्व रक्कम बुडवण्याचा संशयितांचा उद्देश आहे. असे फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादी कोकरे यांची विश्वासघाताने फसवणुक करुन तसेच बँकेत फिर्यादीचे व त्यांचे नातेवाईकांचे नावे बनावट अकाऊंट काढुन त्यासाठी बनावट कागदपत्र तयार करुन तसेच फिर्यादीचा विश्वासघात करुन फिर्यादीस नाहक त्रास देवुन त्यांची पोलीस स्टेशनला तक्रार देवुन तेथे हेलपाटे घालावयास लावुन, वर्तमानपत्रात Paid NEWS, देवुन, गुंडांकडुन व स्वता धमकावुन तसेच फिर्यादीच्या व्यवसायिक मित्रांना त्रास देवुन, व्यवसायातील स्पर्धक मित्रांना सांगुन त्रास देणे या फिर्यादीकडे गुंतवणुक करणा-या इसमांना खोटी माहीती देवुन, या फिर्यादीवर व्यवसायिक नुकसान करुन, दबाव आणण्याचा प्रयत्न चालु आहे. तसेच दमदाटी करुन खंडणी स्वरुपात रकमांची मागणी करती आहेत. तसेच फिर्यादीच्या घेतलेल्य रकमा बुडविण्याचा प्रयत्न चालु आहे, त्यासाठी हे सर्व प्रकार संशयित करीत आहेत.
फिर्यादी दशरथ कोकरे यांची २६ एकर जमीन हडप करण्यासाठी यासाठी संशयितांनी पुणे येथील विद्या सहकारी बॅकेत बोगस खाते उघडून त्या खात्यावर दस्ताएवढी रक्कमा जमा करून त्या रक्कमा संशयितांनीच काढून घेतलेल्या आहेत. संशयितांना फिर्यादीची वरकुटे मलवडी ता.माण जि.सातारा व कटफळ ता. सांगोला जि. सोलापुर येथील मिळकती पूर्व नियोजित कट करुन फिर्यादीचा विश्वासघात व फसवणुक करुन मिळकतीचे तारणाऐवजी खरेदी दस्त आणले व ते अस्तित्वात आणताना खोटी कारणे सांगितले व सध्या ते उलटुन देण्यास नकार देवुन त्यांचेकडे देय असलेल्या रकमा, खंडणी व व्याजाच्या स्वरुपात सोडुन द्याव्यात यासाठी प्रयत्न करित आहेत व तशी मागणी करीत आहेत.व त्याच्या पुर्ततेसाठी वर नमुद केल्याप्रमाणे त्रास देत आहेत . त्यामुळे फिर्यादी दशरथ कोकरे यांनी वरील दहाजणा विरुध्द म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करत आहेत.