माणदेशी महिला सहकारी बँकेस महसूल विभागाचा फ्रान्किंग मशीन परवाना’ “शासकीय कागदपत्रे फ्रान्किंग (स्टॅम्प) करणे आता म्हसवड मध्ये शक्य”
व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड :
माणदेशी महिला सहकाती बँक लि. म्हसवड यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे माणदेशी महिला बँकेमध्ये आज फ्रान्किंग मशीनचे अनावरण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या हस्ते आज संपन्न झाले याप्रसंगी, जवाहर देशमाने,सचिन देशमाने, आप्पा पुकळे, नितीन दोशी, स्थानिक पतसंस्थांचे चेअरमन व पदाधिकारी, संस्थचे कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वसामान्यांना शासकीय तसेच खाजगी कामासाठी स्टॅम्प असणे शासनाने अनिवार्य केले आहे. त्यासाठी अनेक वेळा स्टॅम्प चा तुटवडा सर्वसामान्यांना जाणवत होता , हीच गरज ओळखून माणदेशी महिला सहकाती बँक लि. म्हसवड यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे माणदेशी महिला बँकेस शासनाकडून परवाना प्राप्त झाला. सदर फ्रान्किंग मशीनचे आज उद्घाटन आणि संबंधित सेवांना प्रारंभ करण्यात आला.
राज्य शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शक पद्धतीने स्टॅम्प खरेदी व्हावी यासाठी जास्तीत जास्त मुद्रांक हे डिजिटल स्वरुपात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व बँका, सरकारी कार्यालये , पतसंस्था , न्यायालये यामध्ये अशा प्रकारे Frank केलेल्या दस्तऐवज यांना महत्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी राज्यामध्ये अनेक महत्वाच्या ठिकाणी सदर मशीनचे परवाने दिले जात आहे. आत्तापर्यंत राज्यातील राज्यातील विविध प्रकारच्या बँकांनी महसूल विभागाशी याबाबत पत्रव्यवहार केले आहेत व त्यामध्ये माणदेशी महिला बँकेला महसूल विभागाकडून परवाना प्राप्त झाला आहे. सदर मशीनचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन बँकेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी उपस्थितांना केले.
चौकट :
फ्रान्किंग मशीनचा परवाना देऊन महाराष्ट्र शासनाने माणदेशी महिला सहकारी बँकेवर विश्वास दाखवलं आहे, आणि त्या माध्यमातून सर्वसामान्यांना तत्काळ सेवा देऊन माणदेशी बँक तो विश्वास सार्थ ठरवेल.
-श्रीमती रेखाताई सुनील कुलकर्णी
मुख्य कार्यकारी अधिकारी
माणदेशी महिला सहकारी बँक लि. म्हसवड