माजी प्राचार्या श्रीमती विमल नानासाहेब देशमुख यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी)
सिद्धनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड; नवचैतन्य विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, गोंदवले बु.; तसेच सरदार वल्लभभाई विद्यालय, साखरवाडी या शैक्षणिक संस्थांमध्ये शिस्तप्रिय प्राचार्या म्हणून उल्लेखनीय सेवा बजावलेल्या माजी प्राचार्या श्रीमती विमल नानासाहेब देशमुख (वय – __) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी दुःखद निधन झाले.

विद्यार्थीप्रिय, मनमिळावू स्वभावाच्या आणि कडक शिस्तीच्या प्राचार्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले. त्या प्राध्यापक डॉ. कु. प्रज्ञा आबासाहेब माने व व्यवस्थापन संशोधक कु. प्राची आबासाहेब माने यांची मावशी होत.

त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण, भाचे-भाच्या असा परिवार आहे.
त्यांचं सावडणे व दशक्रिया विधी कार्यक्रम रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सिद्धेश्वर, कुरोली (ता. खटाव, जि. सातारा) येथे होणार असल्याची माहिती प्रा. डॉ. कु. प्रज्ञा माने यांनी दिली.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!