माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या आमदार फडातून राजारामबापू हायस्कुलला १० लाख रुपये !
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सादिक खाटिक
आटपाडी दि . १९ ( प्रतिनिधी )
राजारामबापू हायस्कुलसाठी आमदार फडातून १० लाख रुपये देत असल्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर यांनी केली .
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर जन स्वराज यात्रा सुरू आहे . आटपाडी तालुक्यातील दिघंची पासून सुरू झालेल्या जनस्वराज यात्रेचे ठिकठिकाणी शेकडोंनी उस्फूर्त स्वागत केले . आटपाडी येथील राजारामबापू हायस्कुल समोरील रोडवर या यात्रेतील गाड्यांचा प्रचंड ताफा येताच फटाक्याच्या आतषबाजी, टाळ्या, घोषणांच्या कडकडाटात राजारामबापू हायस्कुल परिवारातील शेकडोंच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले . श्री भवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादीचे नेते विकासराव देशमुख, मुख्याध्यापक टी. डी. चव्हाण यांच्या उपस्थितीत करणेत आला .

भविष्यात राजारामबापू हायस्कुलच्या उपक्रमात सामील व्हा . भाजपपासून फारकत घ्या . लोकशाही संविधान वाचविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा . आज देशाला बहुजन नेतृत्वाच्या एकजुटीची गरज आहे . असे आवाहन रावसाहेबकाका पाटील, सादिक खाटीक यांनी केले .
संविधान लोकशाही हा आपला आत्मा आहे . भविष्यात संविधान समर्थकांच्या समवेतच आपली वाटचाल राहणार आहे . माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या पिताश्रींच्या नावच्या या राजारामबापू हायस्कुल या प्रशाले विषयी मला लहानपणा पासून मोठे आकर्षण राहीले आहे . प्रशालेतल्या कार्यक्रमासाठी पुर्ण दिवसाचा वेळ काढून मी येणार आहे . तुमच्या समवेत जेवणार आहे . लवकरच या कार्यक्रमाचे नियोजन करा . राजारामबापू हायस्कुलमधील ग्रंथालयासाठी माझ्या आमदार फंडातून दहा लाख रुपयांचा निधी मी देत आहे, अशी घोषणा माजी मंत्री, आमदार महादेवराव जानकर यांनी केली .
या जनसंवाद यात्रेवेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी , शिक्षक, तालुक्यातील लोकांसह रासपचे जिल्ह्याचे नेते लक्ष्मणराव सरगर, उमाजीराव चव्हाण, अजितराव पाटील, तात्यासाहेब गायकवाड, राष्ट्रवादीचे नितीन डांगे, दीपक पाटील, प्रशालेतील शिक्षक दादासाहेब मोटे, साहेबराव पाटील, संतोष पाटील, महादेव देवकर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते