माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांचे सोमवार पासून बेमुदत उपोषण सुरू.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी –
उरमोडीचे पाणी राऊतवाडी बंधारा मध्ये सोडावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचे निवेदन देऊनही उरमोडीचे पाणी न सोडल्याने सिन्हा यांनी सोमवार पासून आमरण
उपोषणाला सुरुवात केली आहे. म्हसवडसह पूर्व भागातील राऊतवाडी, माने वस्ती, ढोकमोड, हिंगणी, देवापूर भागात जनावरांना व माणसांना दुष्काळी परिस्थितीचा फटका मोठा बसत असून प्रचंड हाल सुरु आहेत तरी या परिस्थितीत त्यांना उरमोडीचे पाणी मिळाले तर काहीअंशी दिलासा मिळेल.या भागातील शेतकऱ्यांनी उरमोडीच्या पाण्यासाठी पैसेही भरले तरी अद्याप पाणी सोडण्यात आले नाही.

माजी नगराध्यक्ष विजयभाऊ सिन्हा यांचे वय ६७ असून त्यांना मधुमेह आहे तरी ते पाण्यासाठी बेमुदत उपोषण करत आहेत.या बेमुदत उपोषणाला माजी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर, माजी नगराध्यक्ष नितिन दोशी, इंजि. सुनिल पोरे, किशोर सोनवणे, कैलास भोरे, जवाहर देशमाने, बाळासाहेब राजेमाने, संजय भागवत, शशी देठे,सपोनि राजकुमार भुजबळ तसेच चळवळीतील ज्येष्ठ सहकारी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपोषणाला भेट दिली तसेच शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.