माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी प्रशासनाकडे केलेल्या मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आणी म्हसवड नगरपरिषद हद्दीतील सर्व मटन, चिकन, चायनीज, मच्छी विक्री दुकाने बंद करणेत बाबत तसेच दारु विक्री व्यवसायही बंद ठेवणेबाबत म्हसवड नगरपालिकेने आदेश दिले
अयोध्येत सोमवारी श्रीराम प्राणप्रतिष्ठा होणार आहे या पार्श्वभूमीवर म्हसवड शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर म्हसवड नगरपरिषद हद्दीतील मटन, चिकन, मच्छी तसेच दारु विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी केली आहे
सोमवार दि २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे त्यानिमित्त संपूर्ण देशभरात तसेच म्हसवड शहरात होमहवन, विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत त्या निमित्त म्हसवड नगरपरिषद हद्दीतील सर्व मटन, चिकन, चायनीज, मच्छी विक्री दुकाने बंद करणेत यावीत तसेच दारु विक्री व्यवसायही बंद रहावेत अशी मागणी निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी केली होती
या मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून म्हसवड पोलीस ठाण्याचे सपो नि शिवाजीराव विभूते व म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांनी मांसाहारी विक्रेत्याना नोटीसा द्वारे आदेश दिले आहेत की म्हसवड नगरपरिषद हद्दितील सर्व मांस विक्रेते व मांसाहारी हॉटेल व्यावसायिक व ढाबा मालक, सर्व मटण, चिकन, मच्छी व चायनिज विक्रेत्यांना कळविणेत येते की, श्री क्षेत्र अयोध्या नगरी येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सोमवार दिनांक २२/०१/२०२४ रोजी होणार असून आपल्या शहरामध्ये हा उत्सव मोठ्या आनंदमय व भक्तिमय मार्गाने साजरा होणार आहे. तरी सोमवार दिनांक २२/०१/२०२४ रोजी म्हसवड शहरात कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन, मच्छी, चायनिज दुकाने, मांसाहारी हॉटेल अथवा ढाबा, मद्य (दारू) दुकान मालकांनी आपली दुकाने कोणत्याही प्रकारे सुरू न ठेवता संपूर्ण बंद ठेवावीत. सर्व विक्रेत्यांना व दुकान धारकांना या सूचनेची दखल घेवून नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ माने यांनी कले आहे