माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या विविध मागण्यांसाठी ग. शि.लक्ष्मण पिसे यांची सकारात्मक पावले

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड :प्रतिनिधी
माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माणचे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पंचायत समिती माण (दहिवडी) येथे शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले, त्यावेळी त्यांनी या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षकांच्या सेवा पुस्तिका भरण्याबाबत लवकरच आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीमार्फत पत्र निघण्याची ग्वाही देण्यात आली. तसेच तालुक्यातील सर्व शिक्षकांची सेवा पुस्तके मागवली जाणार आहेत. निवडणुकीतील दीर्घकालीन ड्युटी देऊ नये, या मागणीवरही चर्चा झाली असून लवकरच प्रांताधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव 2025 पर्यंत मागवले जातील, तसेच शालेय पोषण आहारासाठी सुसूत्रता आणण्यासाठी शालेय पोषण आहार अधीक्षक परीट साहेबांशी चर्चा करून स्वयंपाकी व मदतनीस यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवनियुक्त मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचे वेतन निश्चिती व पडताळणी लवकरच पूर्ण करण्यात येईल.

शाळेच्या वेळेसंदर्भात आठ ते बारा असा बदल करण्याच्या प्रस्तावावर जिल्हास्तरावर पत्रव्यवहार करण्यात येईल. जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना शासनाच्या जीआरनुसार वेतनवाढ देण्याच्या मागणीवर देखील विचार केला जात आहे, आणि त्याबाबतची माहिती लवकरच जिल्हा स्तरावर पाठवली जाणार आहे.

या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत दोरगे, जिल्हा संपर्कप्रमुख एम.डी. दडस, माण तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष घोडके, सरचिटणीस सी.एम. जाधव, शिक्षक नेते राजेंद्र कदम, विजय बनसोडे, नितीन काळे, महादेव महानवर, महादेव कदम, सुशील त्रिगुणे,आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!