खटाव मतदारसंघात जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ सो. सोनिया गोरे यांची प्रभावी बैठक; दुष्काळमुक्त माण-खटावसाठी पुन्हा ‘कमळ’ चिन्हाला पाठिंबा देण्याचे आवाहन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.मा. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) यांनी खटाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचारसभा घेतली. खरशिंगे, येळीव, कारंडेवाडी येथे आयोजित या बैठकीत त्यांनी ग्रामस्थ मान्यवरांसह माता-भगिनींशी संवाद साधत मतदारसंघातील विकासकामांची माहिती दिली आणि आगामी निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हाला मत देण्याचे आवाहन केले.
दुष्काळमुक्त माण-खटावसाठी जलसिंचन योजनांची मोठी कामगिरी
सौ. सोनिया गोरे यांनी आपल्या भाषणात माण-खटाव मतदारसंघातील जलसिंचन क्षेत्रातील अभूतपूर्व विकासकामांचा आढावा घेतला. जयकुमार गोरे भाऊ यांनी तालुक्यातील दुष्काळमुक्तीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी महत्त्वपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने नेले असून, त्यामुळे येथील शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला आहे. या जलसिंचन योजनांमुळे तालुक्यातील शेती फुलणार आहे, तर शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
याच अनुषंगाने, औंध आणि इतर २१ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी देखील जयकुमार गोरे यांनी ठोस प्रयत्न केले आहेत. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांत हे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास सौ. सोनिया गोरे यांनी यावेळी व्यक्त केला.
विकासाचा ओघ कायम ठेवण्यासाठी ‘कमळ’ चिन्हाला मोठे मताधिक्य द्या
सौ. सोनिया गोरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना आवाहन करत सांगितले की, “माण-खटाव मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी जयकुमार गोरे यांचे नेतृत्व आवश्यक आहे. त्यांनी सुरू केलेल्या विकासाचा ओघ पुढे नेण्यासाठी येत्या २० तारखेला कमळ चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या गावातून मोठे मताधिक्य द्यावे.” यावेळी जनतेच्या प्रतिसादाने सभा गगनात भिडली आणि ग्रामस्थांनी यावेळी समर्थनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रचारसभेत ज्ञानेश्वर पवार, विठ्ठल पवार, शिवाजीराव सर्वगोड यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ आणि माता-भगिनींनी जयकुमार गोरे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
या उत्स्फूर्त सभेमुळे खटाव तालुक्यातील गावागावांतून जयकुमार गोरे यांच्याबद्दल जनतेत सकारात्मक लाट निर्माण झाली आहे