सुळकी आई देवी यात्रेनिमित्त भाविकांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
इम्रान मुल्ला
गारवड (माळशिरस):
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सुळकी आई देवीच्या यात्रेचे आयोजन गारवड, तालुका माळशिरस येथे करण्यात आले होते. उंच डोंगरावर वसलेल्या या प्रसिद्ध देवस्थानाची यात्रा दोन दिवस चालते, ज्यात हजारो भाविक गाव, परिसर आणि जिल्ह्याच्या विविध भागांतून देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. यात्रेचा आनंद घेत असताना भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतल् याचे विशेष वैशिष्ट्य होते.

 

यात्रेनिमित्त गारवड ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सर्व सदस्यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी व उपकेंद्र गारवड यांच्या तर्फे डॉक्टर माने देशमुख व डॉक्टर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवा केंद्र उभारण्यात आले.

 

यामध्ये फार्मासिस्ट, आरोग्य सहाय्यक, आशा सेविका, आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यात्रेकरूंना पिण्याचे शुद्ध पाणी, रक्तदाब तपासणी, ओटी टेस्ट, बँडेज, तसेच किरकोळ आजारांवर औषधोपचार दिले गेले. भाविकांना आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला.

या उपक्रमामुळे, यात्रेकरूंनी डॉक्टर माने देशमुख, डॉक्टर सय्यद मॅडम आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचार्‍यांचे मनःपूर्वक आभार मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!