माण तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन जनावरांसाठी चारा छावणी व चारा डेपो त्वरित सुरु करावे :बाबासाहेब माने
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
माण -खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन जनावरांसाठी चारा छावणी व चारा डेपो सुरु करणे व त्याअनुषंगाच्या मागण्याचे निवेदन माण तालुका अध्यक्ष श्री बाबासाहेब माने,यांनी माण चे तहसीलदार यांना दिले
तहसिलदार माण यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण उत्तर भारतात व महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातून पावसाने हाहाकार माजवला असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम बाजूच्या घाट माथ्यावर देखील पाऊसाने थैमान घातले असून नद्या नाल्यांना आलेल्या पुरा मुळे कित्येक वाहने व जनावरे वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील माण व खटाव तालुके पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे टैंकर ची मागणी करत आहेत. ऑगस्ट महिना सुरु होऊन एक आठवडा संपला तरी माण खटाव मध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा पहिला खरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला आहे. लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून जनावरे चा-या विना तडफडत आहेत.
या परीस्थितीत माण खटाव मध्ये त्वरित दुष्काळ जाहीर करून-
1) शासनाच्या वतीने संपूर्ण माण तालुक्यात जनावरासाठी चारा छावणी व चारा डेपो व त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय त्वरित उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे.
2) मागणी होणा-या गावातून लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टैंकर त्वरित सुरु करावेत..
3) मजुरांसाठी रोजगार हमीची कामे त्वरित सुरु करावीत.
4) उरमोडी धरणातून माण तालुक्या साठी सोडण्यात येणा-या पाण्यासाठी ची पाणीपट्टी दुष्काळी परिस्थिती मुळे माफ करण्यात येवून शक्य असेल तेथील छोटे तलाव, धरणे, भरून द्यावीत.
5) सरकारी बँका, पतसंस्था यांची कर्ज वसुली थांबवण्यात यावी.
6) विना अनुदानित शाळेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फी माफी करण्यात यावी.
वरील मागण्यांची पूर्तता त्वरित पूर्ण होण्यासाठी शासन स्थरावर तात्काळ निर्णय होऊन माण वासियांना दिलासा देण्यात यावा अन्यथा माण तालुका कॉंग्रेस कमिटी च्या वतीने दहिवडी तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही या निवेदनाद्वारे देण्यात आला त्याप्रसंगी माण तालुका अध्यक्ष श्री बाबासाहेब माने, सातारा जिल्हा उपाध्यक्ष आणि माण तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री एम के भाऊ भोसले, माण खटाव विधानसभा अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव, सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अमरजीत कांबळे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ नकुसाताई जाधव माण तालुका पक्षप्रवक्ते शिवाजीराव यादव, माण विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष टिल्लूबाबा बागवान, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक परेशजी जाधव, माण तालुका उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, दाऊद मूल्ला चंद्र शिंदे, निलेशराव पोळ, विश्वासराव जाधव, प्रविण अवघडे, संदीप चव्हाण इ.सह तालुक्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होत.