म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रेत आकर्षण ठरत आहे “फायर बँक बाईक”

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :प्रतिनिधी
म्हसवड नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात अलीकडेच फायर बँक बाईकचा समावेश करण्यात आला असून, ही बाईक सध्या सिद्धनाथ यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहे. पालिकेचे आरोग्य निरीक्षक सागर सरतापे यांनी या विशेष बाईकची माहिती दिली.

सरतापे यांनी सांगितले की, शासनाच्या अग्निशमन संचालनालयाच्या वतीने ही फायर बँक बाईक पालिकेला प्रदान करण्यात आली आहे. ही बाईक आग व आपत्ती व्यवस्थापनासाठी एक प्रभावी साधन आहे. बाईकला तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी सायरन, रुग्णवाहिकेप्रमाणे दिवा, वॉकी-टॉकी, स्पीकर आणि माईक यांसारख्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे.

बाईकच्या दोन्ही बाजूंना लावलेल्या डिक्कीत आग विझवण्यासाठी लागणारे फम (आग नियंत्रक लिक्विड) ठेवलेले आहे. त्यामुळे गर्दीच्या किंवा अडचणीच्या ठिकाणीही ही बाईक तात्काळ पोहोचून आग विझवण्याचे काम करू शकते. यात्रेच्या काळात, खास करून गर्दीच्या ठिकाणी, नागरीकांना योग्य सूचना देण्यासाठी बाईकवर असलेला स्पीकर व माईक उपयुक्त ठरत आहे.

सिद्धनाथ यात्रेसारख्या मोठ्या उत्सवाच्या काळात ही फायर बँक बाईक नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरदान ठरत असून, आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी देणगी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!