विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता ही काळाची गरज : प्रशांत सुळ
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड.. प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया म्हसवड शाखेचे व्यवस्थापक प्रशांत सुळ यांनी केले.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे बँकिंग व्यवहार व आर्थिक साक्षरता याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते.,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हसवड शाखेचे व्यवस्थापक प्रशांत सुळ होते.यावेळी बोलताना सुळ म्हणाले शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच बँकिंग व्यवहार व आर्थिक साक्षरतेची माहिती घेणे गरजेचे आहे.आर्थिक साक्षरता प्रबोधनाबाबत क्रांतिवीर शाळेने आयोजित केलेल्या उपक्रमाबाबत सुळ यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी बँक शाखेत खाते उघडणे,त्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता,कर्ज वितरण, ठेवी,व्याजदर,बचत सेविंग अकाउंट,फोन पे, गुगल पे,बँक पासवर्ड, लॉकर, पैसे भरणे व काढणे स्लिप, पासबुक,शैक्षणिक कर्ज,पीक कर्ज, आरबीआय बँक भूमिका व स्थापना परिचय,जीवन विमा पॉलिसी,गुंतवणूक, म्युचल फंड,पेन्शन पॉलिसी ,चलनाचे वितरण,मुद्रा व इतरकर्ज योजना इत्यादी बाबत व्यवस्थापक प्रशांत सुळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.क्रांतिवीर शाळेने आपल्या उपक्रमशीलतेच्या जोरावर राज्यस्तरावर अनेक वेळा सन्मान मिळवल्याबद्दल शाळा व्यवस्थापन , तसेच मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा प्रशांत सुळ यांनी विशेष गौरव व्यक्त केला.
यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी प्रास्ताविक करून शाळेतील विविध उपक्रमाची माहिती दिली.यावेळी औदुंबर पोरे,क्रांतिवीर शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम घाडगे यांनी केले तर उपस्थिताचे आभार साधना दुधाळ व्यक्त केले.