अखेर अजिनाथ केवटे यांच्या ११ दिवसाच्या उपोषणाला यश  म्हसवड बस स्थानकाचे काम सुरु 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड 
    अजिनाथ केवटे यांनी १४ ऑगस्ट रोजी सुरु केलेल्या   उपोषणाला यश येऊन आज ११ व्या दिवशी  म्हसवड बस स्थानकाचे काम सुरु  झाले
             म्हसवड एस.टी बसस्टँड चे  अनेक वर्षे रखडलेले अर्धवट बांधकाम पूर्ण करावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ लक्ष्मण केवटे -( रिपब्लीकन सेना माण तालुका अध्यक्ष) यांनी म्हसवड एस टी स्टॅंडजवळ१४ ऑगस्ट पासूनआंदोलन सुरु केले होते
             या आंदोलन स्थळी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन आपला पाठींबा दिला होता एस टी महामंडळाने अनेकवेळा आंदोलन स्थळी भेटून लवकरच काम सुरु करत असल्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात काम जोपर्यंत सुरु होत नाही तोपर्यंत  कसल्याही परीस्थीतीत उपोषण माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन केवटे यांनी आपले उपोषण सुरुच ठेवले त्यांनी केलेल्या ११ दिवसाच्या उपोषणा दरम्यान त्यांना हळूहळू सर्वच राजकिय पक्ष  संघटना  व कार्यकर्त्यांचा पाठींबा वाढत गेला आणी
बुधवार दि २३ रोजी शहरातील सर्व संघटना व सर्व पक्षातील पदाधिकारी व नागरीकांनी रास्तारोको  केल्यामुळे  आज दिनांक 24/8/2023 रोजी महाराष्ट्र परिवहन मंडळ यांनी ताबडतोब दखल घेऊन आज रोजी बसस्थानकाचे काम  प्रत्यक्षात सुरु  केले बस स्थानकाचे अर्धवट प्रलंबित बांधकाम तत्काळ सुरू केल्यामुळे व आठ महिण्यात काम पूर्ण करणार असल्याचे लेखी  आश्वासन दिल्यामुळे   अजिनाथ केवटे यांनी  ११ दिवस चालु असलेले  आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले  त्या नंतर नवीन ठेकेदार मे एस स्वेअर इन्फ्रा. पुणे कॉन्ट्रॅक्टर याच्या विनंती वरून कामा चा शुभारंभ  अजिनाथ केवटे  यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला बस स्थानकाचे काम चालू झाल्या मुळे  म्हसवडकर नागरीकांनी  फटाके वाजवून आनंद व्यक्त केला

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!