व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापुर प्रतिनिधी:
इंदापुर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगांव येथे आज आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला.
या आठवडी बाजारामध्ये चिमुकल्यांनी पालेभाज्या, फळभाज्या, फळे, स्टेशनरी, खाऊगल्लीअंतर्गत थंडगार सरबते, ज्यूस, चिकन बिर्याणी, पाणीपुरी, डोसे, इडली सांबर आधी विविध पदार्थांचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक गुणांची चमक दाखवत पन्नास हजार रुपयांची विक्रमी उलाढाल केली.
तत्पूर्वी या आयोजित उपक्रमाचे उद्घाटन सरपंच अँड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांच्या शुभहस्ते व व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.अनिल धुमाळ, उपाध्यक्ष सौ.निता सल्ले इतर सर्व सदस्य, ग्रामपंचायत उपसरपंच स्वाती भोईटे, तसेच ग्रा.पं.सदस्य, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित उद्घाटन संपन्न झाले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच अँड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
गावातील विविध पदाधिकारी, पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित सर्वांनी भाजी बाजार खरेदी करण्याचा व बाजारातील खरेदीदार ग्रामस्थ सर्वांनीच खाऊगल्लीअंतर्गत विविध खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारला. शाळेच्या या आनंदी बाजाराला गावातील आठवडे बाजारापेक्षाही मोठ्या बाजाराचं स्वरूप निर्माण झाल्याचे चित्र शाळेच्या प्रांगणामध्ये दिसून आले.
यावेळी राजलक्ष्मी कलेक्शन भिगवण यांच्या वतीने क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले तसेच यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ताराचंद ढोले सर ,शिक्षक श्री.सुनील वाघ सर, श्री रामचंद्र चौधर सर, श्री.शहाजी म्हेत्रे सर, बाजीराव गावडे सर, संतोष वनवे सर, राजेंद्र खोमणे सर, सौ.ललिता साबळे मॅडम, श्री.संतोष इंगुळकर सर या सर्वांनी परिश्रम घेतले...