सातारा -पंढरपूर मार्गावर भीषण अपघात: मुख्याध्यापिका जयश्री देशमुख यांचा मृत्यू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
प्रतिनिधी – म्हसवड:
पुण्याहून आटपाडी कडे प्रवास करीत असताना सातारा -पंढरपूर मार्गावर वाण्याची झाडी येथे अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू, तर एक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडला.

रामचंद्र निवृत्ती देशमुख (वय ६०, निवृत्त शिक्षक) आणि त्यांची पत्नी जयश्री रामचंद्र देशमुख (वय ५२, मुख्याध्यापिका, श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूल, आटपाडी) हे आपल्या टाटा बोल्ट हॅचबॅक (गाडी क्रमांक MH10CH3624) मधून पुण्याहून आटपाडी कडे जात होते. म्हसवड जवळ वाण्याची झाडी येथे रामचंद्र देशमुख यांना झोपेची डुलकी लागली, त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या सेफ्टी रेलिंगला जोरदार धडकली.

अपघात इतका भीषण होता की सेफ्टी रेलिंग गाडीच्या पुढील बाजूत घुसून, ड्रायव्हर साइडला बसलेल्या जयश्री देशमुख यांच्या पोटात घुसले, त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस हजर झाले असून, मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तर, रामचंद्र देशमुख यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना म्हसवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार करत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!