भाटकी :प्रतिनिधी भाटकी (ता माण ) येथे १ जुलै कृषी दिन वसंतराव नाईक जयंती शेतकऱ्यांच्या कष्टकरांचा सन्मानाचा दिवस यानिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कृषी दिनानिमित्त भाटकी जिल्हा परिषद शाळेच्या शिवारामध्ये वृक्षरोपण करण्यात आले. डाळिंब व सीताफळाचे व्यवस्थापनची माहिती कृषी पर्यवेक्षक रामदास जाधव यांनी दिली
छत्रपती शिवाजी सभागृह येथे शेतकऱ्यांना माण तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे यांनी कृषी विभागाच्या योजनेबद्दल सर्व मालाचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सूर्यफूल बियाणाचे वाटपही व करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक रामदास जाधव, कृषी परवेक्षक हरिभाऊ वेदपाठक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल कर्चे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश फुले, कृषी सहाय्यक भाटकी उत्तम तिकुटे उपस्थित होते. या प्रसंगी भाटकी गावांमधून युवा शेतकरी अजित गोरख शिर्के, सोहम शिर्के,मच्छिंद्र शिर्के,मोहन शिर्के, कैलास पोळ, नामदेव शिर्के, ब्रह्मदेव शिर्के व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर कार्यक्रमाच्या आयोजन शंभू महादेव डाळिंब शेतकरी गटाने केले होते