प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बाबुराव चव्हाण यांचे दुःखद निधन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
कुलदीप मोहिते
विहापूर येथील नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि पर्यावरणप्रेमी बाबुराव चव्हाण यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासोबतच त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
चव्हाण यांनी रस्ते आणि पायाभूत सुविधा विकासामध्ये नेहमीच पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भर दिला. घाट परिसरात झाडांचे संगोपन करताना वाहतुकीस अडथळा न होता नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी त्यांनी विशेष कृती आराखडा सुचवला होता. तसेच, त्यांनी कृत्रिम तळ्यांची संकल्पना राबवून जलसंधारणासाठी मोठे कार्य केले.
माजी बांधकाम मंत्री दादासाहेब जगताप यांचे निकटवर्तीय असलेल्या चव्हाण यांनी दळणवळण सुविधा सुधारण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. ते सेंद्रिय शेतीचे समर्थक होते आणि त्यांनी युवकांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. सध्या कारखान्याच्या निवडणुका सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.