व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड : प्रतिनिधी वरकुटे म्हसवड येथील प्रवाश्यांना आता अहिंसा पतसंस्थेच्या पुढाकारामुळे पिकप शेडच्या माध्यमातून निवारा मिळणार आहे. या उपक्रमामुळे प्रवाश्यांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळणार असून, त्यांना दिलासा मिळेल. माजी. नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांच्या हस्ते या बस प्रवाशी थांब्याचे भूमिपूजन करण्यात आले.
या संकल्पनेला प्रवर्तक अमोल माने यांनी सुरुवात केली होती, ज्याला संस्थेच्या संचालक मंडळाने मान्यता दिली. या प्रसंगी संचालक महावीर व्होरा, राजेंद्र भागवत, कॅशियर महेश पतंगे, बाबू मुल्ला यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या सुविधेबद्दल आनंद व्यक्त केला आणि अहिंसा पतसंस्थेचे आभार मानले.
“स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आमच्या गावात प्रवाशांसाठी अशी सोय उपलब्ध झाली आहे,” असे ग्रामस्थांनी सांगितले.