भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना ॲड.पांडुरंग जगताप यांनी विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल,अपयशाने खचून न जाता ध्येयाने येणाऱ्या संकटांना तोंड देऊन पुढील वाटचाल करा तरच यशाची शिदोरी चाखता येईल असे मत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भिगवण आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले एक आदर्श आणि संयमी व्यक्तिमत्व आदरणीय श्री ॲड. पांडुरंग जगताप, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल कमिटीचे सदस्य श्री मानसिंग जाधव, श्री राहुल गाडे ,सामाजिक कार्यकर्ते श्री छगन वाळके,श्री नवनाथ ढेरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री भोसले विजयकुमार ,विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ सोनवणे मॅडम आणि विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व सेवक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री धायगुडे सर यांनी केले. यानंतर उपस्थितांचा यथोचित सन्मान झाला. यावेळी कलाशिक्षक श्री राऊत सर यांचा चित्रकलेतील स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट निकाल लावल्याबद्दल तर श्री मोरे सर यांचा तालुकास्तरीय उत्कृष्ट BLO म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.विद्यालयाशी जुळलेला ऋणानुबंध विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यामध्ये मोटे तनुश्री, पूर्वा माने ,प्रगती ठवरे, शाबाद शेख, भूमिका खुस्पे,प्राची गायकवाड, नियती चिंचोळे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेबद्दल असणारे प्रेम आणि ज्ञानरूपी शिदोरीचा वसा स्पष्ट केला. शिक्षक मनोगतात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री टेंबरे सर आणि ज्युनिअर विभागातर्फे श्री मोरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून ,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ध्येयाची आवश्यकता असते हे स्पष्ट करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सरते शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य भोसले सर यांनी आपल्या मनोगत आतून विद्यार्थ्यांना शाळेत बद्दलची आस्था अशीच कायम आपल्या मनात ठेवून शाळेची मान कशी उंचावेल त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांचा मान कसा वाढेल याकडे आवर्जून लक्ष देण्यास सांगून, शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासण्यास सांगितले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री लकडे सर यांनी उपस्थितांचे मनापासून आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ मोरे मॅडम आणि श्री वाबळे सर यांनी केले…