सविस्तर वृत्त…. कराड तालुक्यातील विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या विद्यानगर सैदापूर येथे श्री महिला उद्योग समूह यांच्या वतीने 16 ते 18 ऑक्टोंबर या दिवशी सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
बाजारपेठेत कौशल्य विकास व हस्तकला व रोजच्या जीवनामध्ये उपयोगी वस्तू खाद्यपदार्थ याचे बाजारपेठेत ग्रामीण भागातील महिलांना त्यांनी केलेल्या व्यवसायाचं मार्केटिंग व विक्री यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे व त्यांनी स्वतःचा व्यवसाय या दृष्टिकोनातून सक्षम व्हावे यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी श्री महिला उद्योग समूहाच्या कामिनी थोरात व वनिता डोंबे यांनी गेले चार ते पाच वर्ष हा उपक्रम राबवता व्यस्त जीवनात आपला अमूल्य वेळ खर्च न करता त्यांना एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू मिळण्यासाठी व महिला सक्षमीकरण व महिलांना व्यवसायिक व्यासपीठ निर्माण होण्यासाठी हा उपक्रम घेतला जातो..
स्त्रीला सामाजिक आर्थिक दृष्ट्या सक्षम करून समाजाच्या आर्थिक विकासाचा पाया बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे स्त्रियांनी उद्योजक व्हावं व छोट्या व्यवसायातून आर्थिक उन्नती व सामाजिक जबाबदारी निर्माण व्हावी यासाठी आम्ही हा उपक्रम घेत आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुहास जगताप यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले विशेष म्हणजे या प्रदर्शनात खाद्यपदार्थापासून ते गृह उपयोगी वस्तू आहेत लोप पावणारी ग्रामीण संस्कृती त्यावर आधारित शिल्पकला याच्या सुद्धा वस्तू आहेत त्यामुळे या प्रदर्शनाला महिलांची गर्दी होत आहे या खाद्यपदार्थ सुद्धा आहेत कराड तालुक्यातील कार्वे येथील छोट्या उद्योजिका.नम्रता शेटेनावर यांनी मांडलेल्या खाद्य स्टॉलमध्ये कर्नाटकी धपाटे मिरची दही याच्यापासून तयार केलेले कर्नाटकी खाद्यपदार्थ याला खूप मोठी मागणी आहे या खाद्यपदार्थातून सेंद्रिय शेती व केमिकल मुक्त शेतीचा शरीराला पोषक असा आहार याचा संदेश दिला जातो हल्ली अनेक खाद्यपदार्थ बाजारपेठेत उपलब्ध आहेत या खाद्यपदार्थातून जीवनसत्वे व पौष्टिक आहार शरीराला मिळत नाही त्यामुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागते जर पौष्टिक आहार शरीराला मिळाला तर शरीर तंदुरुस्त मन सुद्धा तंदुरुस्त राहू शकते आरोग्याची योग्य काळजी घेतली व खाद्यपदार्थांमध्ये जीवनसत्वे असणारे घटक वापरले तर पोटाचे विकार किंवा पचन प्रक्रियेतील आजार होणार नाहीत असे मत नम्रता शेटेनावर यांनी व्यक्त केले या
कार्यक्रमासाठी कामिनी थोरात वनिता डोंबे संगीता महाडिक ज्योती लिमकर समशाध डांगे अनिता कांबळे व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.सुहास जगताप मित्रपरिवार यांची उपस्थिती होती मोठ्या प्रमाणात ग्राहक महिला व परिसरातील नागरिकांनी रेड चिली हॉटेल सैदापूर विद्यानगर कराड येथे मोठ्या प्रमाणात महिला ग्राहक व परिसरातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती