बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या विद्यार्थी कलाकृती स्पर्धेचा उत्साहपूर्ण समारोप
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर :प्रतिनिधी
मुंबई:
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागामार्फत आयोजित विभागीय मध्यवर्ती विद्यार्थी कलाकृती स्पर्धा व प्रदर्शन पारितोषिक वितरण कार्यक्रम 2024-25 दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी परेल भोईवाडा मनपा शाळा संकुलाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या स्पर्धेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध भाषिक शाळा, एम.पी.एस., सीबीएसई, आयसीएसई शाळांमधील इयत्ता 1ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण 8000 विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक कलाकृती सादर केल्या, त्यातील उत्कृष्ट कलाकृतींना सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यानुभव शिक्षकांनी तयार केलेल्या विषयानुसार कलाकृतींनाही पारितोषिके जाहीर करण्यात आली.


